सोनल नगरमध्ये पहिल्याच पावसात नाले तुंबले; पाणी घरांमध्ये शिरल्याने नागरिक त्रस्त

Image
जालना प्रतिनिधी समाधान खरात  जालना शहरातील सोनल नगर परिसरात आज सकाळी झालेल्या पहिल्या पावसानेच नागरी सुविधांच्या दाव्यांची पोलखोल झाली. परिसरातील नाल्यांची नियमित स्वच्छता न झाल्याने पावसाचे पाणी नाल्यातून वाहून न जाता रस्त्यावर तुंबले. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले असून नागरिकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागले. तुंबलेल्या पाण्याचा निचरा न झाल्याने ते थेट नागरिकांच्या घरांमध्ये शिरले. महिलां व ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. पहिल्याच पावसात अशी परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा नाल्यांची स्वच्छता व दुरुस्ती करण्याची मागणी केली होती.तसेच या सोनल नगर मध्ये ज्या गुत्तेदाराने काम केले आहे ते चुकीच्या पद्धतीने केले असल्याचे निवेदन महानगर पालिका प्रशासनास वेळोवेळी देऊन सुद्धा प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच ही अवस्था निर्माण झाल्याने पुढील काळात मुसळधार पाऊस झाल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली...

सातोना येथील यश ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटमध्ये विक्रमी 172 रक्तदान

परतूर प्रतिनिधी /हनुमंत दवंडे
     सातोना येथील छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त यश अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड परतूर व बाजीराव पाटील आकात बहुउद्देशीय सेवाभावी संस्था सातोना खुर्द यांच्या संयुक्त विद्यमाने येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी रक्तदान शिबिराचे भव्य आयोजन करण्यात आले होते. श्री ह. भ. प. बाळू महाराज गिरगावकर यांच्या शुभहस्ते फित कापून शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी अनेकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या व ज्यांनी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्याचे चळवळ खऱ्या अर्थाने सुरू करून दिली असे स्वर्गीय महेश भाऊ सितारामजी आकात व दत्तात्रय सितारामजी आकात यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले.
              यावेळी श्री ह. भ. प. बाळू महाराज गिरगावकर यांच्यासह परिसरातील 172 जणांनी रक्तदान केले. 
दरम्यान यश प्रा .व मा. विद्यालयाचा माजी विद्यार्थी ज्ञानेश्वर भागवतराव आकात याने वैद्यकीय पूर्वपरीक्षेत(एमबीबीएस) घवघवीत यश संपादन केल्याबद्दल उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह देऊन पालकांसह गौरविण्यात आले.
       यावेळी यश अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड परतूरचे चेअरमन बालासाहेब सितारामजी आकात, आसारामजी लाटे, इंद्रजीत घनवट, यश महेशराव आकात , बालासाहेब उद्धवराव आकात, संतोष आकात, अनिल बोराडे, जयराम खंदारे, जगनदादा आकात, शिवाजी महाराज, सतीश आकात ,डॉ.अंबादास टाले, माऊली आण्णा लाटे, डॉ संजय लाटे, बाबासाहेब लाटे, भांगे. यांची प्रमुख उपस्थिती होती. 
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शामिर शेख यांनी तर आभार यश महेशराव आकात यांनी केले. कार्यक्रम यशस्वीपणे पार पडण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Comments

Popular posts from this blog

"संतांच्या कृपेनेच दानाची वृत्ती निर्माण होते"-भ.प. विशाल महाराज खोले

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत