मतदार संघात 200 च्या वर मंदिरांना सभामंडप देऊन परमेश्वराची सेवा केली,माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर, माझ्यायावर पांडुरंगाची कृपा त्यामुळेच मी मंत्री झालो,परमार्थ आश्रम सोयंजना येथे सभामंडपा साठी 15 लक्ष रुपयाचा निधी
परतूर प्रतिनिधी/हनुमंत दवंडे
मी गेली 35 वर्ष राजकारणाच्या माध्यमातून समाज सेवेबरोबरच ईश्वरी सेवेला वाहून घेतल्यानेच मंत्री पदापर्यंत पोहोचू शकलो माझ्यासारख्या सामान्य कुटुंबातून आलेल्या माणसाला केवळ पांडुरंगाचे कृपा आशीर्वादामुळे इथपर्यंत मजल मारता आल्याचे माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी सांगितले
ते परमार्थ आश्रम सोयंजना ता परतुर येथे गजानन महाराज प्रगट दिनानिमित्त आयोजित द्वि दिवशीय किर्तन सोहळ्याच्या कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते या वेळी ह भ प रामराव महाराज ढोक, ह भ प भागवताचार्य हरिदास जी महाराज बद्रीनारायण ढवळे भाजपा तालुकाध्यक्ष रमेश भापकर, अशोकराव बुरकुले प्रदीप कुमार लड्डा, विक्रम माने सुरेश सोळंके नितीन जोगदंड संपत टकले शत्रुघन कणसे ओमप्रकाश बोरकर गजानन काळे श्यामसुंदर काळे केशव ढवळे विष्णू ढवळे यांची उपस्थिती होती
पुढे बोलताना माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर म्हणाले की मी मतदार संघाचा विकास करत असताना वाड्या-वस्त्या तांडे अशा 200 गावांमध्ये विविध मंदिरांसमोर सभामंडप बांधकाम केले तीर्थक्षेत्र विकास च्या माध्यमातून दैठणा गंगाभारती महाराज संस्थान येथे पावणे दोन कोटीचा निधी देऊन परिसराचा विकास केला कऱ्हाळा येथील करळेश्वर असेल गोखुरेश्वर असेल, निळकंठेश्वर यासह अनेक देवस्थानांचा तिर्थक्षेत्र विकासांतर्गत समावेश करून मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून दिला असेही यावेळी आमदार लोणीकर यांनी संगीतले
======================
माझा वावर हा संत सज्जनांच्या सहवासात असल्यामुळे व मुळात माझ्या वडिलांचे वारकरी संप्रदायाचे संस्कार माझ्यावर असल्यामुळे मला लहानपणापासूनच अभंग हरिपाठ म्हणण्याची सवय असून मला 32 अभंग पाठ असल्याचेही यावेळी आवर्जून त्यांनी उपस्थितांना सांगितले
समाज सेवेला प्राधान्य देत असताना दीनदलित दुबळ्या ची सेवा माझ्या हातून घडावी यासाठी मी सदैव प्रयत्नशील राहिलो ्यामुळेच परमेश्वरी कृपा माझ्यावर असून या कृपेमुळेच मी आज या उंचीपर्यंत पोहोचू शकलो मी दरवर्षी पंढरपूरला जाऊन पांडुरंगाची सेवा करत असतो मी मंत्री असताना पांडुरंगाच्या परिसरामध्ये स्वच्छता अभियान राबवून माझ्या हातून पांडुरंगाने सेवा करून घेतली याचा आपल्याला सार्थ अभिमान असून आयुष्यात कधी कुणाला वाईट मार्गाला लावण्यासाठी राजकारणाचा वापर केला नाही असेही उद्गार यावेळी माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी काढले
यावेळी तालुका अध्यक्ष रमेश भापकर बद्रीनारायण ढवळे गणपतराव टकले शत्रुघन कणसे रामप्रसाद थोरात रमेश राव आढाव नितीन राव जोगदंड गजाननराव कराळे ओम प्रकाश बोरकर विक्रम राव माने अशोकराव बरकुले पंचक्रोशीतील मोठ्या संख्येने भाविक भक्तांची उपस्थिती होती