बरबडा प्रकल्पासाठी पालकमंत्री राजेश टोपे यांनी 350 कोटी रुपये निधी दिल्यास चांदीचा रथ देऊन सत्कार करू - माजीमंत्री आमदार बबनराव लोणीकर,आमदार लोणीकर यांच्या हस्ते आकणी येथील पुलाच्या कामाचे उद्घाटन

प्रतिनिधी हनुमंत दवंडे 
बरबडा प्रकल्पाचे काम मागील अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या आपल्या मंत्रिपदाच्या काळात बरबडा आणि केंधळी गावातील लोकांच्या जमीन आणि घराचा मावेजा त्यांना उपलब्ध करून दिला परंतु माकणी गावातून लोकांनी पुढाकार न घेतल्यामुळे व अंतर्गत विरोधामुळे या गावातील लोकांना मावेजा मिळाला नाही तसेच गावाचे पुनर्वसन देखील रखडले असून पालकमंत्री राजेश टोपे यांनी बरबडा प्रकल्पासाठी 350 कोटी रुपये निधी उपलब्ध करून दिल्यास त्यांचा चांदीचा रथ देऊन सहकुटुंब सत्कार करू असे प्रतिपादन माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी आज केले

आकणी येथे बळीराजा कृषी संजीवनी योजने अंतर्गत येणाऱ्या बरबडा प्रकल्पाला लगतच्या पुलाच्या कामाचे भूमिपूजन आज माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले यावेळी सभापती संदीप भैय्या गोरे सभापती रंगनाथ येवले भाजपा जालना जिल्हा उपाध्यक्ष गणेशराव खवणे उपसभापती राजेश मोरे उपसभापती नागेश घारे माजी उपसभापती अंकुशराव कदम जिल्हा परिषद सदस्य पंजाबराव बोराडे माजी सभापती संभाजी खंदारे संचालक विठ्ठलराव काळे निवास देशमुख सरपंच सोपान वायाळ गणेश चव्हाण अशोक बोराडे रमेश वायाळ विशाल कदम कामाचे कंत्राटदार श्री अंभोरे लघु पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता काजी छगन राठोड यांच्यासह अनेक मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती

केंद्र सरकारच्या बळीराजा कृषी संजीवनी योजने मध्ये मागील पंचवार्षिक मध्ये मंत्री पदावर कार्यरत असताना केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा करून हा प्रकल्प बसवला होता त्यानुसार जमीन आणि घराच्या यासह इतर बाबींसाठी केंद्र सरकारने 25 टक्के निधी देण्याची योजना या योजनेअंतर्गत केली आहे त्यानुसार राज्य सरकारने 350 कोटी रुपये दिल्यास केंद्र सरकार देखील 75 ते 80 कोटी रुपये निधी या प्रकल्पासाठी देईल त्याची जबाबदारी मी घेतो परंतु अनेक वर्ष दबावाचे राजकारण करत या प्रकल्पाला कोणी चकवा दिला खरे झारीतील शुक्राचार्य कोण याचा शोध गावकऱ्यांनी घ्यावा अशा शब्दात लोणीकर यांनी या प्रकल्पाला निधी कसा उपलब्ध होऊ शकतो याबाबत आपलं मत उपस्थितांसमोर मांडलं

गावातील गोरगरीब लोकांना गावापेक्षा दूर शहराच्या ठिकाणी पुनर्वसन नको आहे तसे झाल्यास उर्वरित शेती कशी करावी असा प्रश्न निर्माण होऊ शकतो परिणामी काही धनदांडग्या लोकांच्या अट्टाहासामुळे या प्रकल्पाचा मावेजा तत्कालीन परिस्थितीत गावकऱ्यांनी स्वीकारला नाही परिणामी शेतकऱ्यांना शेतीचा आणि घराचा मावेजा ही मिळाला नाही आणि गावाचे पुनर्वसन देखील झाले नाही जोपर्यंत गावकरी पुढाकार घेत नाहीत तोपर्यंत गावाचे पुनर्वसन कसे होईल असा सवाल देखील लोणीकर यांनी उपस्थितांना केला

गेली अनेक वर्षे राजकारणात काम करत असताना सबका साथ सबका विकास या न्यायाने काम करत आलो असून कुठल्याही परिस्थितीत गोरगरीब सर्वसामान्य माणसाची साथ सोडलेली नाही सर्वसामान्य व्यक्ती केंद्रबिंदू ठरवूनच आम्ही प्रत्येक वेळी काम केले असून आजही सर्वसामान्य नागरिक हाच आमचा केंद्रबिंदू आहे त्यामुळे सर्वसामान्य गोरगरीब नागरिकांना कोणत्याही दबावाला बळी न पडता आपला निर्णय आपण स्वतः घ्यावा तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अर्थ मंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी दिल्यामुळे अनेक धरणांची कामे मार्गी लागली असून या प्रकल्पासाठी देखील जलसंपदा मंत्री श्री जयंत पाटील यांना भेटण्याची विनंती करण्याची गरज पडली तरी ती मी करेल असेही लोणीकर यांनी स्पष्ट केले 

यावेळी प्रकाशराव नरोटे विठ्ठलराव खनके रमेश नरोटे माऊली पोले शिवाजी सापनेर सुभाष सापनेर अमोल लोटे गणेश खनके एकनाथ खनके हरीभाऊ नरोटे निवृत्ती पोले गोपाळ मस्के व्यंकटराव झारगड पांडुरंग लोहटे दशरथ खनके पांडुरंग पोले सखाराम अंभोरे ज्ञानेश्वर पोले सुंदर मोरे भगवान लोहटे नारायण चव्हाण नारायण जाधव गोविंद राठोड मिलिंद मोरे संजय मोरे बालासाहेब खनके निवृत्ती पोले किसनराव मोरे राजेश मोरे यांच्यासह महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या

Popular posts from this blog

लाच स्वीकारताना कारला येथील ग्रामसेवक घुगे यांना रंगेहाथ पकडले

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत

रायगव्हाण येथे शिव महापुराण कथेची अति उत्साहात सांगता....