परतूर तालुक्यात 4 हजारांवर बालकांनी घेतली पोलिओ लस


परतूर प्रतिनिधी हनुमंत दवंडे 
दि.२८ - तालुक्यात रविवारी (दि.27) राबविण्यात आलेल्या पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेत एकूण 4 हजार 318 बालकांनी पोलिओ लस घेतल्याची माहिती ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.ज्ञानेश्वर नवल यांनी दिली. 
    पोलिओ लसीकरण मोहिमेसंदर्भात अधिक माहिती देताना डॉ.नवल यांनी सांगितले की, आरोग्य विभागाच्या वतीने तालुक्यात रविवारी (दि.27) पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात आली.मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळाला. एकूण 4 हजार 318 बालकांना लस देण्यात आली.यामध्ये 5 वर्षांच्या आतील 4 हजार 247 तर 5 वर्षांच्या वरील 72 बालकांचा समावेश आहे.ग्रामीण रुग्णालयासह तालुक्यातील विविध ठिकाणच्या 27 केंद्रावर बालकांना लस देण्यात आली.यासाठी एकूण 70 कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली होती.
-----------------------------
   पोलिओ लसीकरणासाठी एका मोबाईल टीमची स्थापना करण्यात आली होती.या टीमने शेतात, वीटभट्टीवर काम करणा-या मजुरांची मुले तसेच रस्त्याच्या कडेला छोटासा निवारा (पाल) करून राहणा-यांची मुले अशा एकूण 38 मुलांना पोलिओ लस दिली.
-----------------------------

Popular posts from this blog

लाच स्वीकारताना कारला येथील ग्रामसेवक घुगे यांना रंगेहाथ पकडले

रायगव्हाण येथे शिव महापुराण कथेची अति उत्साहात सांगता....

सकल राजस्थानी समाज नवरात्र महोत्सवच्या अध्यक्ष पद्दी शरद भारुका तर सचिव: शुभम चित्तोडा यांची निवड