माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांच्या हस्ते 6 कोटी रुपयांच्या विकास कामाचे उद्घाटन,आष्टी येथे 04 कोटी रुपये किमतीच्या फिल्टर पाण्याची टाकी व अंतर्गत पाइपलाइनच्या कामाचे तर पाटोदा येथे 2 कोटी रुपये दोन पुलाच्या कामाचे व 80 लाख रुपये किमतीच्या रस्त्याच्या कामाचे उद्घाटन,येणाऱ्या निवडणुकां विकास कामांच्या जोरावर जिंकणारपरतूर /प्रतिनिधी हनुमंत दवंडे प्रतिनिधी
आपण मंत्री असताना पाणी पुरवठा खात्याला न्याय देण्याचा प्रयत्न केला त्याचे फलित म्हणून आज परतूर विधानसभा मतदारसंघांमध्ये वॉटर ग्रीड सारखी महत्वकांक्षी योजना सुरू करण्यात आपण यशस्वी झाला असून सध्या या योजनेमार्फत दीडशे गावांना पाणीपुरवठा केला जात असल्याची माहिती यावेळी बोलताना आमदार बबनराव लोणीकर यांनी दिली
ते पाटोदा येथे दैठणा ते जांब समर्थ रस्त्यावरील  02 कोटी रुपयांच्या दोन पुलाच्या कामाचे उद्घाटन व 80 लाख किमतीच्या रस्त्याच्या कामाचे  व आष्टी तालुका परतुर येथील ग्रीड योजनेतील फिल्टर पाण्याच्या टाकीच्या भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते
 पुढे बोलताना ते म्हणाले की, आपण मतदारसंघांमध्ये विकास कामे करत असताना चार हजार 600 कोटी रुपयांचा निधी खेचून आणत या भागातील दोनशेच्यावर रस्त्यांना डांबरीकरणाचे जोडले आष्टी सारख्या भागांमध्ये राष्ट्रीय रूरबन योजनेच्या माध्यमातून तीनशे पंचवीस कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देत या भागातील सोळा गावांचा पायाभूत विकास केला हे करीत असताना आष्टी शहरातील जीर्ण झालेले विजेचे खांब बदलण्याचे काम आसो किंवा आष्टी शहरातील व परिसरातील गावातील अंगणवाड्या रस्ते यासह अनेक संकल्पना राबवल्या हे करीत असताना आष्टी येथे मिनी एमआयडीसीची स्थापना करून येथे शेतमालावर आधारित प्रक्रिया उद्योग उभारणीसाठी आपण प्रयत्न केले लवकरच आपले प्रयत्न यशस्वी होतील यावेळी बोलताना ते म्हणाले
=======================
*येणाऱ्या निवडणुका विकास कामांच्या जोरावर जिंकणार*
=======================
येत्या जिल्हा परिषद पंचायत समिती च्या निवडणुकीमध्ये विकास कामांच्या बळावर निश्चितपणे परतूर विधानसभा मतदारसंघातील निवडणुकांमध्ये शंभर टक्के यशाची खात्री आपणास असून आपण केलेल्या विकास कामाचे बळावरच या निवडणूका जिंकणार असल्याचे यावेळी बोलताना ते म्हणाले
     मतदार संघामध्ये विकास करीत असताना 8 वीज उपकेंद्राची उभारणी एक 220 केव्ही उपकेंद्र शेगाव पंढरपुर दिंडी मार्ग यासह जलयुक्त शिवार मधील नाला खोलीकरण व सरळीकरण रुंदीकरण माती नाला बांध अशा प्रकारची विकासात्मक कामे आपण केलेली असल्यामुळे  जनता भारतीय जनता पार्टी च्या पाठीमागे असल्याचे यावेळी त्यांनी नमूद केले
=======================
*आघाडी सरकारच्या काळात विकास कामांना ब्रेक*
=======================
आघाडीचे सरकार हे दळभद्री सरकार असून जनविकास वरून यांना कुठलेही देणे घेणे नसून हे फक्त मलिदा लाटण्यात पटाईत असल्याचे सांगतानाच शेतकऱ्यांच्या हिताच्या प्रश्‍नावर हे सरकार गंभीर नसून अतिवृष्टीची नुकसानभरपाई म्हणून या राज्य सरकारने राजा उदार झाला आणि हाती भोपळा दिला अशाप्रकारची तुटपुंजी मदत शेतकऱ्यांना केली ज्यांनी शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन सरकार येण्यापूर्वी हेक्टरी 50 हजार रुपये मदतीची मागणी केली होती त्यांनी आठ हजार रुपये शेतकऱ्यांच्या हातावर मदत म्हणून ठेवले ही बाब शरमेची असून राज्यातील सरकार हे शेतकरीविरोधी असल्याचा घणाघात यावेळी माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी केला
=======================
  *या दोन पुला मुळे व रस्त्यामुळे जांब समर्थ -पाटोदा - दैठणा रस्त्यावरील रहदारीचा प्रश्न मिटला*
======================
दैठणा येनोरा पाटोदा जांब समर्थ  समर्थ मार्गावरील या दोन पुलामुळे रस्त्यामुळे रहदारीचा प्रश्न मिटला असून पावसाळ्यामध्ये कसुरा नदीला पूर आल्यानंतर या पुलावरून मोठ्या प्रमाणावर पाणी वाहत होते त्यामुळे या रस्त्यावरची रहदारी नियमितपणे ठप्प होत होती त्यातच गत पावसाळ्यात आबासाहेब पवार नावाचे सहशिक्षक कसुरा नदीला आलेल्या पुरामुळे या पुलावरून वाहून गेले होते व त्यातच त्यांचा दुर्दैवी अंत झाला होता त्यामुळे अशा प्रकारची गंभीर घटना यापुढे घडू नये यासाठी आपण प्रयत्नपूर्वक हे दोन्ही पूल व रस्ता मंजूर केला असल्याचे माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी यावेळी नमूद केले पुढे बोलताना ते म्हणाले की
आपण मंत्री असताना पाणी पुरवठा खात्याला न्याय देण्याचा प्रयत्न केला मराठवाडा वॉटर ग्रीड सारखी योजना ऑस्ट्रेलिया इजराइल श्रीलंका आधी देशातील तंत्रज्ञान पाहून मराठवाड्यात आखली मात्र आघाडी सरकारला सर्वसामान्य जनतेला पाणी पाजायचे नाही म्हणून ही योजना राज्यातील सरकारने थंड बस्त्यात गुंडाळून ठेवल्याचा आरोप यावेळी माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी केला
यावेळी कार्यक्रमाला युवा मोर्चा प्रदेश महामंत्री राहुल लोणीकर तालुका अध्यक्ष रमेशराव भापकर पंचायत समिती सभापती रंगनाथ येवले उपसभापती रामप्रसाद थोरात जिल्हा परिषद सदस्य सुदाम प्रधान विलासराव आकात बद्रीनारायण ढवळे अशोकराव बुरकुले पंचायत समिती सदस्य दिगंबर मुजमुले रामेश्वर तनपुरे प्रदीप ढवळे शिवाजी पाईकराव युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस संपत टकले तालुकाध्यक्ष शत्रुघन कणसे सुरेश सोळंके शहाजी राक्षे, सिद्धेश्वर सोळंके तुकाराम सोळंके नितीन जोगदंड अमोल जोशी बाबाराव थोरात बबलू सातपुते कमलाजी आगलावे मोरे संभाजी शिंदे संभाजी खवल विष्णू काका शहाने तहसीलदार रूपा चित्रक कार्यकारी अभियंता रबडे, उपकार्यकारी अभियंता वाघमारे मस्के यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांची उपस्थिती होती

Popular posts from this blog

अमृत भारत स्टेशन पुनर्विकास योजनेद्वारे परतुर रेल्वे स्थानकाचा कायापालट होणार, परतुर स्थानकाच्या पुनर्विकासासाठी केंद्र सरकारतर्फे २२ कोटी ०८ लाख रुपयांचा निधी - आमदार बबनराव लोणीकर यांचे प्रतिपादन, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या शुभहस्ते ई-भूमिपूजन सोहळा संपन्न, मराठवाड्यातील ०९ स्थानकांच्या पुनर्विकास कार्यक्रम अंतर्गत छत्रपती संभाजीनगर नंतर परतूर येथे सर्वाधिक उपस्थिती

न्यु वंडर किड्स इंग्लीश स्कूल विघार्थ्याचे यश

परतूर येथून चोरीला गेलेला अयशरचा पोलिसांनी लावला गुन्ह्याचा छडा, परतूर पोलिसांचा तपासाला आले यश ८१ किंट्टल ६५ किलो कापूस, आठ लाख रुपये किमतीचा अयशर चोरट्यांनी पळविला होता.