शिवसेना उपशहर प्रमुख परतूर (उत्तर)पदी योगेश राम गाते यांची निवड...
परतूर प्रतिनिधी/हनुमंत दवंडे
शिवसेना मध्यवर्ती कार्यालय परतूर येथे योगेश राम गाते यांची उपशहर प्रमुख पदी निवड करण्यात आली. नियुक्तीपत्र दिलेल्या नियुक्ती पत्रामध्ये मा.शिवसेना प्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने व पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब, व युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या विचाराशी प्रेरित होऊन शिवसेना संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर, ए जे. पाटील बोराडे, मोहन अग्रवाल, बाबासाहेब तेलगड ,अशोकराव आघाव यांच्या विचार-विनिमय करून त्यांच्या आदेशानुसार ही निवड करण्यात आलेली आहे . तसेच आपण बाळासाहेबांचे विचार व शिवसेना व युवा सेनेचे ध्येयधोरण गोरगरीब जनतेच्या फायदा होईल असे करून शिवसेना वाढीस सहकार्य करावे. व पक्षास आपल्याकडून कोणत्याही प्रकारची हानी होणार नाही याची आपण स्वतः दक्षता घ्यावी असे दिलेल्या नियुक्ती पत्रात म्हटले आहे. या वेळी परतूर येथील सर्व शिवसैनिकांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या यावेळी उपस्थित
शिवसेना उपजिल्हाप्रमुख प्रमुख बाबाजी तेलगड,तालुका प्रमुख अशोकराव अघाव,शहर प्रमुख विदुर जईद,सुदर्शन बाप्पा सोळंके,. महेश भैया नळगे,युवा सेना शहर प्रमुख सोनाजी भोकरे,अमोल सुरूंग,विकास खरात,अक्षय बल्लमखाणे, भारत भुसारे,दत्ता अंभोरे माऊली शेळके, संदीप पाचारे,सुदर्शन धुमाळ.