पोलीस स्टेशन आष्टी येथे शांतता कमिटीची बैठक संपन्न...
====================
परतूर प्रतिनिधी/हनुमंत दवंडे
छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सवाच्या निमित्ताने शांतता समितीची बैठक आष्टी पोलीस स्टेशन येथे घेण्यात आली. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा.उद्धवजी ठाकरे साहेब यांनी कोरणा संदर्भामध्ये शिवजयंतीच्या उत्सव साजरा करण्यासाठी काही गाईडलाईन्स दिलेल्या आहेत. त्यामध्ये शिवभक्त शिवज्योत घेऊन जाण्यासाठी 200 लोकांना परवानगी देण्यात आलेली आहे तसेच पाचशे लोकांनी एकत्र येऊन शिवजयंतीचा उत्सव साजरा करावा असे दिलेल्या परिपत्रकात म्हटले आहे याच अनुषंगाने आष्टी पोलीस स्टेशन येथे समता, बंधुता, न्याय, या मूलभूत हक्क याची अंमलबजावणी आपण केली पाहिजे आणि शांततेत शिवजयंती उत्सव आपण साजरी करावा .असे आष्टी पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नागवें साहेब यांनी शांतता बैठकीमध्ये सांगितले .या शांतता बैठकीला उपस्थित म्हणून पंचायत समिती परतूर चे उपसभापती रामप्रसाद थोरात , जागीरदार, सिद्धेश्वर सोळंके, मधुकर बाप्पा खरात, आष्टी ग्रामपंचायत सदस्य, व पत्रकार बंधु, उत्सव समितीचे पदाधिकारी व ग्रामस्थ या वेळी उपस्थित होते.