सूर्यकांताबाई करवा यांचे निधन
तालुक्यातील सातोना खुर्द येथील रहिवाशी सूर्यकांताबाई बालाप्रसाद करवा यांचे दि. १६ फेब्रुवारी २०२२ बुधवार रोजी परभणी येथे रुग्णालयात सकाळी साडेदहा वाजता उपचारा दरम्यान अल्पशा आजाराने निधन झाले. मृत्यू समयी त्या ७५ वर्षाच्या होत्या. त्यांच्या पश्चात तीन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. सातोना व्यापारी महासंघाचे माजी अध्यक्ष संदीप करवा यांच्या त्या आई होत्या.