यंदाचा शिवछत्रपती राज्यस्तरीय जीवनगौरव पुरस्कार डॉ.ओमप्रकाश शेटे यांना जाहीर,माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर व प्रदेश महामंत्री राहुल भैया लोणीकर यांच्या हस्ते होणार पुरस्कार वितरण,आयोजक प्रा.सहदेव मोरे पाटील व डॉ.कल्याण मोरे पाटील यांची माहितीप्रतिनिधी (सुभाष वायाळ )
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती संपूर्ण महाराष्ट्रात अत्यंत उत्साहात साजरी केली जाते. मंठा येथे देखील मोरे पाटील परिवाराच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा वारसा चालवणाऱ्या महानुभवांना दरवर्षी *शिवछत्रपती राज्यस्तरीय जीवनगौरव पुरस्कार* देऊन सन्मानित केले जाते. सन २०२२ या शिवजन्मोत्सवासाठी आरोग्यदूत, मुख्यमंत्री आरोग्य सहायता कक्षाचे तत्कालीन प्रमुख आणि विद्यमान केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ.भारतीताई पवार यांचे स्वीय सहाय्यक डॉ.ओमप्रकाश शेटे यांना हा पुरस्कार देऊन सन्मानित केले जाणार असल्याची माहिती आयोजक प्रा सहदेव मोरे पाटील यांनी आज दिली.

मंठा शहरात मोरे पाटील परिवाराच्या वतीने दरवर्षी शिवजन्मोत्सव अनोख्या पद्धतीने दरवर्षी साजरा केला जातो त्यामध्ये शिवजन्मोत्सव, रक्तदान शिबिर, स्नेहभोजन आणि पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. २०२० साली पहिल्यांदा हा पुरस्कार ह.भ.प. बाळू महाराज गिरगावकर यांना प्रदान करण्यात आला तर २०२१ साली छत्रपती शिवाजी महाराजांचे सहकारी कान्होजी जेधे यांचे थेट १३ वे वंशज राजधिर जी जेधे यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पुरस्कार प्रदान करण्याचे २०२२ हे तिसरे वर्ष असून वैद्यकीय क्षेत्रात अत्यंत प्रभावी पणे काम करतो गोरगरिबांना आजारपणातून बरे होण्यासाठी लाखो रुपयांचा निधी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणारे डॉ.ओमप्रकाश शेटे यांची निवड करण्यात आली आहे.

माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांच्या शुभहस्ते व भाजयुमोचे प्रदेश महामंत्री राहुल भैया लोणीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत १९ फेब्रुवारी २०२२ शनिवार रोजी सकाळी ११ वाजता मोरे हॉस्पिटल मार्केट कमिटी मंठा त्याठिकाणी शिवजन्मोत्सवानिमित्त मोरे पाटील परिवाराच्यावतीने हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडणार आहे. मुख्यमंत्री आरोग्य सहायता कक्षाच्या माध्यमातून १२१० कोटी रुपयांसह २४ लाखापेक्षा अधिक रुग्णांना मोफत उपचार उपलब्ध करून देण्यासाठी डॉ.ओमप्रकाश शेटे यांनी २०१५ ते २०१९ या कालावधीत प्रयत्न केले असून महिला, पुरुष, लहान बालके यांच्यासह अनेकांना या मोफत उपचाराचा लाभ झाला आहे असेही आयोजकांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

कॅन्सर पीडित रुग्ण, 'आशा दि किरण' परियोजना, रक्षा शिबिराच्या माध्यमातून लाखो हृदयरोग पीडित रुग्ण, 'मिशन द मुस्कान' प्रोजेक्ट अंतर्गत ३००० पेक्षा अधिक बालकांवर मोफत शस्त्रक्रिया, कॅन्सर रोखण्यासाठी ९३५ पेक्षा अधिक मुलींसाठी एचपीव्ही लसीकरण अभियान, दिव्यांग महायज्ञाच्या माध्यमातून हजारो दिव्यांग बांधवांना साहित्य वाटप, पशु शिबिर अंतर्गत ५००० पेक्षा अधिक गरजू शेतकऱ्यांना करोडो बीज वितरण, ० ते १३ वर्ष वयाच्या लहान मुलांसाठी मिशन प्रेरणा योजनेअंतर्गत मोफत उपचार करण्याची सुरुवात, भारतरत्न सचिन तेंडुलकर जी यांच्या माध्यमातून ३ कोटी रुपयांची बोन मॅरो ट्रान्सप्लांट साठी लागणारी महत्त्वपूर्ण उपकरणे उपलब्ध करण्यात महत्त्वपूर्ण सहभाग यासह मोठ्या प्रमाणावर आरोग्यसेवेसाठी डॉक्टर ओमप्रकाश शेटे यांनी कार्य केले आहे त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना या वर्षीचा शिवछत्रपती राज्यस्तरीय जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्याचा मोरे-पाटील परिवाराचा मानस असल्याची माहिती आयोजक डॉ.कल्याण मोरे पाटील यांनी दिली
=====================
*डॉ.ओमप्रकाश शेटे यांना मिळालेले विविध पुरस्कार*
सर्वश्रेष्ठ प्रशासकीय अधिकारी पुरस्कार (सांगली, जालना), आदर्श प्रशासकीय अधिकारी पुरस्कार (सांगली), दक्षिणेश्वर पुरस्कार (लातूर), तत्कालीन सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते राज्यस्तरीय मुकनायक पुरस्कार, स्वर्गीय लोकनेते बाबुराव आडसकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिला जाणारा जीवनगौरव पुरस्कार, महाराष्ट्र रत्न पुरस्कार आदी पुरस्कारांनी डॉ.ओमप्रकाश शेटे यांना सन्मानित करण्यात आले असून मेनोन मिशन महाराष्ट्र या तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विशेष अंक रूपी पुस्तकात पाचव्या क्रमांकाचे स्थान डॉ.शेटे देण्यात आले होते तसेच कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स डीमेड युनिव्हर्सिटी यांच्यावतीने डॉक्टरेट (डि.लीट.) ही पदवी देऊन डॉ. ओमप्रकाश शेटे यांना यापूर्वी सन्मानित करण्यात आले आहे अशी माहिती आयोजक प्रा.सुदर्शन मोरे पाटील यांनी दिली
========================
मंठा येथे शिवसृष्टी बहुद्देशिय सेवाभावी संस्था व मोरे पाटील परिवाराच्या वतीने दरवर्षी शिवजन्मोत्सव स्वखर्चाने साजरा केला जात असून दरवर्षी रक्तदान शिबिर,स्नेहभोजन, शिवजन्मोत्सव आणि पुरस्कार वितरण समारंभ आयोजित केला जातो पारिवारिक स्वरूपात शिवजन्मोत्सव साजरा करण्याचे मोरे पाटील परिवाराचे हे १५ वे वर्ष असून छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आणि वारसा जपण्याचा छोटासा प्रयत्न मोरे पाटील परिवाराच्या वतीने करण्यात येतो दरवर्षी आयोजित रक्तदान शिबिराच्या माध्यमातून १०० पेक्षा अधिक रक्तदाते स्वखुशीने रक्तदान करतात त्यामध्ये पुरुष रक्तदात्यांनी बरोबर महिला रक्तदात्यांचा देखील उल्लेखनीय सहभाग असतो रक्तदान शिबिराचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन, छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन, पुरस्कार वितरण व त्यानंतर लगेचच स्नेहभोजन असा दरवर्षीचा हो जन्मोत्सवाचा कार्यक्रम आयोजित केलेला असतो सर्वांनी या शिवजन्मोत्सवात सहभाग नोंदवावा अशी विनंती आयोजक बाबासाहेब पाटील मोरे, किसनराव पाटील मोरे, प्रा.सहदेव मोरे पाटील, प्रा.सुदर्शन मोरे पाटील, डॉ.कल्याण मोरे पाटील, अशोक मोरे पाटील यांनी यानिमित्ताने केली आहे

Popular posts from this blog

अमृत भारत स्टेशन पुनर्विकास योजनेद्वारे परतुर रेल्वे स्थानकाचा कायापालट होणार, परतुर स्थानकाच्या पुनर्विकासासाठी केंद्र सरकारतर्फे २२ कोटी ०८ लाख रुपयांचा निधी - आमदार बबनराव लोणीकर यांचे प्रतिपादन, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या शुभहस्ते ई-भूमिपूजन सोहळा संपन्न, मराठवाड्यातील ०९ स्थानकांच्या पुनर्विकास कार्यक्रम अंतर्गत छत्रपती संभाजीनगर नंतर परतूर येथे सर्वाधिक उपस्थिती

न्यु वंडर किड्स इंग्लीश स्कूल विघार्थ्याचे यश

लाच स्वीकारताना कारला येथील ग्रामसेवक घुगे यांना रंगेहाथ पकडले