माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांना छत्रपती गौरव पुरस्कार जाहीर,मातोश्री बहुउद्देशीय सेवाभावी संस्थे च्या वतीने ह भ प पुरुषोत्तम पाटील महाराज यांच्या हस्ते दिला जाणार पुरस्कार,मातोश्री बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे तुकाराम सोळंके यांची माहिती
परतूर प्रतिनिधी/हनुमंत दवंडे
भारतीय जनता पार्टीचे नेते माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांना मातोश्री बहुउद्देशीय सेवाभावी संस्था अकोली ता परतुर च्या वतीने छत्रपती गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला असून हा पुरस्कार दिनांक 20 फेब्रुवारी रोजी आष्टी ता परतूर येथे ह भ प पुरुषोत्तम पाटील महाराज यांच्या शुभहस्ते प्रदान केला जाणार आहे पुरस्काराचे हे प्रथम वर्ष असून यापुढे दरवर्षी मातोश्री बहुउद्देशीय सेवाभावी संस्था अकोली च्या वतीने राजकीय सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या व्यक्तींना हा पुरस्कार दिला जाणार असल्याचे मातोश्री बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष तुकाराम सोळंके यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे
पुढे या पत्रकात म्हटले आहे की माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी गेल्या सहा सात वर्षांमध्ये फडणवीस सरकारच्या काळामध्ये पाणीपुरवठामंत्री पदाचा भार सांभाळताना राज्यात यापूर्वी कधीही माहित नसलेल्या खात्याला नवसंजीवनी देत राज्यभरामध्ये 18000 गावामध्ये पाणीपुरवठा योजना केल्या त्याच बरोबर राज्यात 70 लाख शौचालय बांधून स्वच्छतेच्या बाबतीत देशात महाराष्ट्राचा क्रमांक एक मिळवून दिला हे करीत असताना माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी मतदार संघातील समतोल विकास साधण्यावर भर देत इतिहासात कधी नव्हे इतका विकास मतदार संघाचा केला 4 हजार 700 कोटी रुपयांची कामे मतदारसंघात करीत असताना शेगाव पंढरपूर सारखा विदर्भ मराठवाड्याला जोडणारा शेगाव पासून तर पंढरपूर पर्यंतचा दिंडी मार्ग त्यांच्या अथक प्रयत्नातून साकार झाला मतदार संघात दळणवळणाच्या सोयी अतिशय निकृष्ट होत्या हे हेरून त्यांनी मतदार संघातील प्रत्येक गावाला डांबरीकरणाने जोडून दळण वळणाची उत्तम व्यवस्था निर्माण केली, मतदार संघामध्ये एकत्रित फिल्टर पाणी पुरवठा योजना आखून पाण्याचे दुर्भिक्ष असणाऱ्या मतदार संघात खऱ्या अर्थाने जलक्रांती घडून आणली.
मराठवाड्यात नियमितपणे दुष्काळ पडतो हे ध्यानात घेऊन येथील पाण्याचे दुर्भिक्ष दूर व्हावे यासाठी मराठवाडा वॉटर ग्रीड सारखी योजना आखली मात्र राज्यातील सरकार बदलामुळे सद्यस्थितीमध्ये ही योजना ठप्प आहे
यासह विजेचा प्रश्न सोडवताना जिल्हाभरात 49 तेहत्तीस केव्ही उपकेंद्र उभारली तर जालना येथे व परतूर येथे अनुक्रमे 220 के व्ही वीज केंद्रे निर्माण केली तसेच जमिनीतील पाण्याची हजार फुटापर्यंत खाली गेलेली पातळी वर आणण्यासाठी जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून सिमेंट नाला बांध नदी खोलीकरण रुंदीकरण यासारखा महत्वकांक्षी प्रकल्प यशस्वीपणे राबवला असेही तुकाराम सोळंके यांनी पत्रकात नमूद केले आहे
======================
*मंत्री नितीन गडकरी यांच्या माध्यमातून 2000 कोटींचा शेगाव पंढरपूर मार्ग आमदार बबनराव लोणीकर यांच्यामुळे झाला*
======================
माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितींनजी गडकरी यांच्या माध्यमातून 2000 कोटी रुपयांचा शेगाव पंढरपूर सारखा अतिमहत्त्वाकांक्षी विदर्भ मराठवाड्याला जोडणारा रस्ता मंजूर करून घेतला या रस्त्याच्या कामाचे उद्घाटन नितींनजी गडकरी यांच्यासह वाटुर तालुका परतुर येथ अनेक संत महंत यांच्या उपस्थितीत संपन्न झाले आणि आज हा रस्ता पूर्ण झालेला असून या रस्त्यावरून रहदारी सुरू झालेली असल्याचे तुकाराम सोळंके यांनी म्हटले आहे
या रस्त्यामुळे परतूर विधानसभा मतदारसंघातील तळणी ते गंगा सावंगी या भागातील सर्व नागरिकांना अतिशय जलद दळणवळणाची सुविधा उपलब्ध झाली असल्याचे लग्न झालं ही या पत्रकात सोळंके यांनी म्हटले आहे
=======================
*1100 सामूहिक विवाह लावून ,लावून सामाजिक उत्तर दायित्व निभावले*
=======================
समाजात असलेली आर्थिक दुर्बलता ही माजी मंत्री आमदार बबनराव यांनी लक्षात घेऊन समाजातील गोरगरीब असणाऱ्या सर्वधर्मीय वधू-वरांचे मनी मंगळसूत्र कपडेलत्ते भांडीकुंडी गादी पलंग देऊन 1100 सामूहिक विवाह लावून दिले हे करीत असताना वैयक्तिक विवाहामध्ये जो थाट असतो अशाप्रकारचा थाट या सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये गोरगरिबांच्या मुला-मुलींचा त्यांनी केला
=======================
*आमदार लोणीकरांचे सामाजिक व धार्मिक कार्यातही मोठे योगदान*
======================
गेल्या पस्तीस वर्षांपासून राजकीय पटलावर काम करत असताना माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी सामाजिक कार्याबरोबरच धार्मिक कार्यात ही मोठे योगदान दिले असून त्यामध्ये 1100 सर्वधर्मीय उपवर मुला मुलींचे सामूहिक विवाह सोहळ्याच्या माध्यमातून विवाह लावून दिले
त्याचबरोबर माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी देहू आळंदी येथे झालेल्या राष्ट्रीय वारकरी संत संमेलनाच्या भोजन व्यवस्थेची जबाबदारी शिरावर घेऊन देशभरातून आलेल्या वारकरी संप्रदायाच्या संत महंतांची उत्तम भोजनाची व्यवस्था केली हे करीत असताना या संमेलनावर हेलिकॉप्टर मधून पुष्पवर्षाव करीत सर्व संत महंतांचे स्वागत केले
त्यांनी केलेल्या या विकासाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मातोश्री बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने यावर्षी माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांना छत्रपती गौरव पुरस्कार देण्यात येणार असल्याचे तुकाराम सोळंके यांनी म्हटले आहे
येत्या 20 फेब्रुवारी रोजी सकाळी 11:00 वाजता आष्टी ता परतुर येथे ह भ प पुरुषोत्तम पाटील महाराज यांच्या शुभहस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष तुकाराम सोळंके यांनी दिली असून या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन त्यांनी केले आहे