सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

वखार महामंडळ ते बस स्टॅन्ड रस्ता सिमेंट काँक्रेट करण्यात यावा या मागणी करिता नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांना निवेदन सादर....

परतूर प्रतिनिधी/ हनुमंत दवंडे
वखार महामंडळ ते बस स्टँड रस्ता सिमेंट काँक्रिटीकरण करण्यासाठी मुख्याधिकारी नगरपरिषद यांना रहिवाशांचे निवेदन परतूर नगरपालिका हद्दीतील एकता नगर, सदानंद नगर ,राजे मल्हार नगर ,तसेच नागवंश नगर ,या नवीन वसाहती दहा ते पंधरा वर्षे  स्थायिक झालेले आहेत. परंतु नगरपरिषद पालिकेकडून या सर्व वसाहतींना जोडणारा कच्चा रस्ता किंवा सिमेंट काँक्रेट रस्ता नगर परिषदेने अजूनही कॉंक्रिटीकरण केलेला नाही .अनेक वेळा निवेदन देऊन सुद्धा याकडे त्यांनी कानाडोळा केलेला आहे त्यामुळे आम्हाला सर्व रहिवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे .तरी आमची सर्व नागरिकांची एकच मागणी आहे की तात्काळ रस्ता नगरपरिषद ने लवकरात लवकर सिमेंट काँक्रीटीकरण करावा नसता आमच्या सर्व रहिवाशांच्या वतीने आपल्या नगर परिषद कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा  नागरिकांनी दिला आहे..
निवेदन वरील सह्या उद्धव देवराव शेंडगे ,प्रभाकर  गोरे ,सुभाष पिसाळ ,बाळू रावसाहेब बकाल, मथुरा तातेराव गोरे ,यादव आकाश भालेकर, आकाश राम भाऊ सोनटक्के ,विशाल आव्हाड, सुनील थोरात, नरेश कांबळे ,केशवराव शेंडगे, अनिल गोरे ,उमाशंकर ,व्यंकट चव्हाण, दामोदर थोरात ,गंगाधर ऊनवणे, बाळासाहेब गोरे ,रामेश्वर लहाने, माऊली गायकवाड ,भगवान गणेश आढाव ,प्रमोद पिसाळ, शंकर भालेकर, आकाश पानझाडे, केशव राठोड, बाळू चिखले ,योगेश घोंगडे ,हरणाची आढाव ,नंदाबाई गोरे, नागोराव ढोणे ,भाऊराव गायकवाड, मारोतराव खरवडे ,नागेश राऊत, कृष्णा जैत सुरेश रामभाऊ जय नामदेव गोरे ,उदावंत कृष्णा, गायकवाड, प्रदिप मस्के, दीपक लबासे  पांडुरंग भालेकर, डिके ल बासे सुंदर सागुते, अशोक गोंधळी, शिवाजी गोरे ,देवराव गणपत शेंडगे ,मीरा शेंडगे, धनंजय खांडेभराड ,आदींची या वेळी उपस्थिती होती..

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत