मंठा पोलीस ठाणे येथे विद्यार्थ्यांने जाणून घेतले पोलीस कामकाज



 मंठा प्रतिनिधी /सुभाष वायळ
       दि.21 तालुक्यातील पांगरी गोसावी येथील जिल्हा परिषद प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी नुकतेच मंठा पोलीस स्टेशनला भेट दिली.यावेळी आयोजित कार्यक्रमात बोलतांना पो.नि.देशमुख यांनी केले.या भेटीत विद्यार्थ्यांनी पोलीस स्टेशनचे कामकाज कशाप्रकारे चालते याविषयीची माहिती घेतली. यावेळी पोलिस निरीक्षक संजय देशमुख,पत्रकार संरक्षण समिती तालुकाध्यक्ष रणजित बोराडे,मुख्याध्यापक के.के. भांडवलकर,फौजदार बलभीम राऊत,आसमान शिंदे यांची उपस्थिती होती.
     या अभिनव उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी गुन्हा कसा दाखल होतो, ठाणे अंमलदाराचे कार्य, सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा उपयोग कसा केला जातो, समाजामध्ये शांतता आणि सलोखा राखण्यासाठी पोलीस कशाप्रकारे काम करतात आदीबाबत सविस्तर माहिती पोलीस निरीक्षक यांनी विद्यार्थ्यांना दिली.यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांच्या अनेक प्रश्नांना उत्तरे देऊन त्यांच्याशी मनमोकळा संवाद साधला.शालेय विद्यार्थ्यांनी मोबाईलचा वापर कशा पद्धतीने करावा याविषयी देखील माहिती दिली.मोबाईल वापरताना कोणती काळजी घेतली पाहिजे याविषयी देखील सांगितले. महिला पोलीस कर्मचारी सविता फुलमाळी यांनी मुलींना न घाबरता अन्याय विरोधात तक्रार देण्यासाठी त्यांनी पुढे आले पाहिजे असे आवाहन केले.यावेळी शंकर राजाळे,दीपक आढे,प्रशांत काळे,विजय तांगडे, विशाल खेडकर,संतोष बनकर,गायके,आनंद ढवळे,दिपक ढवळे, संदीप राठोड, पांडुरंग हागवणे,कानबाराव हराळ, मांगीलाल राठोड,शिक्षिका एस.एस.पोले,शिक्षक आर.डी.सुरनार यांच्यासह आदींची उपस्थिती होती.
Show quoted text

Popular posts from this blog

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत

रायगव्हाण येथे शिव महापुराण कथेची अति उत्साहात सांगता....

परतूर सेलू रोडवर मोटर सायकल झॉलो गाडीचा अपघात