तळणी येेथे एकाच रात्री एक बोलेरो गाडी बॅंक व कापड दुकानावार धाडसी चोरी
मंठा प्रतिनिधी /रवी पाटील
तालूक्यातील तळणी येथे एकाच रात्री चोरट्यानी एक बोलेरो गाडी बॅंक व कापड दुकानावार धाडसी चोरी केल्याने ग्रामस्थ व व्यापाऱ्यात भितीचे वातावरण आहे तळणी हे मोठी बाजारपेठ असल्याने येथे मोठी आर्थीक ऊलाढाल असते तळणी येथे गेल्या दोन ते तीन महीन्यापासून सतत चोऱ्याच्या प्रमाणात वाढ झाली असून याकडे पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष आहे तळणी पोलीस चौकीचे . कर्मचारी कुठल्या ना कुठल्या कारणाने सतत गैरहजर राहत असल्याची प्रतिक्रीया व्यापाऱ्यानी मंठा पोलीस निरीक्षक संजय देशमूख यांच्या समोर व्यक्त केली आज सकाळी तीनच्या सुमारास झालेल्या तीन ठिकाणच्या एका चोरीमध्ये तळणी व परीसरातील नितीन सरकटे यांची प्रसीध्द बँक मंठा ग्रामीण को ऑप क्रेडीट सोसायटीचे शटरचे लाँक तोडून तिजोरीला छेडछाड करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला गेला बॅंकेमधील सीसी टीव्हीचे पूर्णपणे नुकसान करून चोरट्यानी डीव्हीआर पळवून नेला बॅंकेच्या बाजूलाच माऊली कापड केद्रातील नवीन कापडाची अंदाजे एक लाखाची चोरी व दहा हजाराची नगदी रोकड चोरट्यानी लंपास केली आहे जनार्धन आडळकर यांच्या मालकीचे हे कापड दुकान असुन सहा महीन्यापूर्वीच हे दुकान नावारूपास आले आहे तळणीतील सततच्या छोट्या मोठया चोऱ्यानी व्यापारी ञस्त आहे काही महिन्यापूर्वी . सुध्दा महाराष्ट्र ग्रामीण बँकेवर सुद्धा असाच दरोडयाचा प्रयत्न झाला त्यासदर्भात काय तपास झाला हे पोलिसांनाच माहीत तसेच शिवाजी जनार्धन राऊत यांची बोलेरो गाडी तिचा क्रमांक एम एच २८ ए एन ०४६३ असुन चोरट्यानी ही गाडी पळवली आहे सकाळी बँक फोडल्याची चर्चा सगळीकडे होत असताना व सी सी टीव्ही फुटेज तपासत असताना त्या फुटेज .मध्ये गाडी गेल्याचे स्पष्ट दीसून आल्यानंतर गाडी चोरीला गेल्याचे स्पष्ट झाले सततच्या छोट्या मोठया चोऱ्या व तळणी येथील पोलीस . कर्मचारार्याची .आनियमीत ता व कमतरता .या साठी तळणी व्यापारी . संघाकडून मंठा पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांना निवेदन देण्यात .आले यावर व्यापारी महासंघांच्या सर्व पदाधी कार्याच्या स्वाक्षऱ्या आहेत तळणी येथील चोऱ्या सदर्भात पोलीस नक्कीच तपास लावतील काही पोलीस कर्मचार्याच्यां प्रशिक्षणामुळे अडचणी असुन लवकरच राञीची गस्त सुरू करण्याच्या सूचना तळणी पोलीसांना दिल्या असल्याचे सजय देशमुख यांनी सांगीतले व्यापाऱ्यामध्ये भितीचे वातावरण आहे या आधी सुध्दा निवेदन देऊन काही फायदा झाला नाही पोलीस कर्मचार्यानी राञीची गस्त घालावी त्यासाठी तळणी व्यापारी महासंघ मदत करेल गोविंद सरकटे अध्यक्ष्य व्यापारी महासंघ तळणी यावेळी मंठा पोलीस निरीक्षक संजय देशमुख बलभीम राऊत आसमान शिंदे दिपक आढे सोपान चव्हाण प्रंशात काळे दीलीप कातकडे आदी पोलीस कर्मचार्यानी पाहणी केली तसेच अंगुली निर्दशन विभागाने बँकेतील चोराचे ठसे हस्तगत केले असुन श्वान पथकाला पाचारण करण्यात आले असुन गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया मंठा पोलीस ठाणे येथे सुरू होती