राजेश (भैय्या)टोपे यांना कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे गोदावरी गौरव पुरस्कार जाहीर -शिवाजी भालेकर (राष्ट्रवादी ओबीसी सेल जिल्हा उपाध्यक्ष)


परतूर प्रतिनिधी /हनुमंत दवंडे 
नाशिकच्या कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे यंदाचे गोदावरी गौरव पुरस्कार आज जाहीर झाले. यंदा कोरोना काळात आपलं कर्तव्य बजावताना केलेल्या लोकसेवेबद्दल आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. नाट्य दिग्दर्शक आणि अभिनेता अतुल पेठे, विज्ञान क्षेत्रातल्या योगदानाबद्दल डॉ. हेमचंद्र प्रधान, चित्रकला क्षेत्रातल्या योगदाना बद्दल डॉ. सुधीर पटवर्धन, प्रख्यात तबला वादक पं. सुरेश तळवळकर आणि अदम्य साहस दाखवल्याबद्दल नाशिक जिल्ह्यातल्या सीताबाई काळु घारे यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. 
सीताबाई घारे यांनी बिबट्याशी झुंज दिली हेाती. प्रतिष्ठानचे विश्वस्त हेमंत टकले आणि कार्यवाह मकरंद हिंगणे यांनी आज नाशिक इथं वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली. २१ हजार रूपये रोख, सन्मान चिन्ह, सन्मानपत्र असं या पुरस्काराचं  स्वरूप आहे. येत्या १० मार्च रोजी नाशिक मध्ये या पुरस्कारांचं  वितरण होणार आहे. कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीनं १९९२ सालापासून विविध क्षेत्रातल्या येागदानाबद्दल एक वर्षा आड हे पुरस्कार दिले जातात. राष्ट्रवादी ओबीसी सेलचे शिवाजी भालेकर व राष्ट्रवादी कार्यकर्ते यांनीं आमदार राजेश भैय्या टोपे साहेब यांचा सत्कार केला या वेळी राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष शिवाजीराव भालेकर, नाजेर कुरेशी ,   बालासाहेब ढेरे ,  एन. खरात , शिवाजी डोळझाके ,  खलेक कुरेशी , रामेश्वर ढेरे, अंबादास वढे, विवेक ढोके, महेश भालेकर , ज्ञानराज भालेकर, राजवीर भालेकर , रामभाऊ भालेकर आदी मंडळीकडून सत्कार करण्यात आला.

Popular posts from this blog

अमृत भारत स्टेशन पुनर्विकास योजनेद्वारे परतुर रेल्वे स्थानकाचा कायापालट होणार, परतुर स्थानकाच्या पुनर्विकासासाठी केंद्र सरकारतर्फे २२ कोटी ०८ लाख रुपयांचा निधी - आमदार बबनराव लोणीकर यांचे प्रतिपादन, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या शुभहस्ते ई-भूमिपूजन सोहळा संपन्न, मराठवाड्यातील ०९ स्थानकांच्या पुनर्विकास कार्यक्रम अंतर्गत छत्रपती संभाजीनगर नंतर परतूर येथे सर्वाधिक उपस्थिती

न्यु वंडर किड्स इंग्लीश स्कूल विघार्थ्याचे यश

लाच स्वीकारताना कारला येथील ग्रामसेवक घुगे यांना रंगेहाथ पकडले