तीर्थक्षेत्र विकासाच्या माध्यमातून नळडोह चा कायापालट करणार - माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर,नळडोह येथे आमदार श्री.लोणीकर यांच्या हस्ते भव्य सभागृहाचे लोकार्पण
मंठा प्रतिनिधी/पप्पू घनवट
मागील पंचवार्षिक मध्ये मंत्रिपदाच्या कार्यकाळात अनेक तीर्थक्षेत्रांचा विकास करण्याची संधी मिळाली त्या माध्यमातून अनेक विकास कामे तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी केली त्यातीलच मोठ्या सभागृहात पैकी एक असणारे सभागृह न डोह या ठिकाणी उभारण्याची संधी मला मिळाली भविष्यात देखील तीर्थ क्षेत्र विकासाच्या माध्यमातून नळडोह या तीर्थक्षेत्राचा कायापालट करण्यासाठी मी कायम तत्पर राहील असा विश्वास माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी आज नळडोह या ठिकाणी दिला.मंठा तालुक्यातील नळडोह येथे संत जनार्दन महाराज संस्थान यात्रेनिमित्त आयोजित कार्यक्रम प्रसंगी श्री लोणीकर यांच्या हस्ते या सभागृहाचे लोकार्पण करण्यात आले, श्री लोणीकर यांच्या विशेष निधीतून परतूर विधानसभा मतदार संघात २० पेक्षा अधिक मोठी सभागृहे देण्यात आली होत ०२ हजार पेक्षा अधिक लोक बसू शकतील अशा प्रकारचे मोठे सभागृह बांधकाम केल्यामुळे गोरगरीब लोकांच्या लग्नासाठी, मंदिराशी संबंधित वेगवेगळ्या कार्यक्रमांसाठी, तसेच महापुरुषांच्या जयंत्या-पुण्यतिथ्या इत्यादी कार्यक्रमांसाठी भविष्यात मंडप लावण्याची गरज पडू नये व आर्थिक बचत व्हावी या उद्देशाने ही सभागृह बांधण्यात आली होती त्यातील मंठा तालुक्यातील नळडोह येथे २० लक्ष रुपये किमतीच्या मोठ्या सभागृहाचे लोकार्पण माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांच्या शुभहस्ते आज करण्यात आले
यावेळी विठ्ठल मामा काळे, गजानन देशमुख, प्रसादराव गडदे, संभाजीराजे खंदारे, ज्ञानेश्वर माऊली वायाळ, अशोक आप्पा सोनटक्के, विनायक आप्पा सोनटक्के, शिवशंकर डोईफोडे, माऊली राठोड, खोराड सावंगी सरपंच पंकज राठोड यांच्यासह संत जनार्दन महाराज संस्थान नळडोहचे भास्कर आप्पा सोनटक्के, अंशीराम थोरात, अशोक आप्पा सोनटक्के, कान्होबा थोरात, जिजाभाऊ गिराने, सुधाकर आप्पा सोनटक्के, उद्धवराव सोनकर, बाळासाहेब कौटकर, विनायक नरवाडे, परसराम लाखुळे, केजी वरणकर, गोबरा राठोड, ओमकार वरणकर, कैलास थोरात, ज्ञानेश्वर थोरात तसेेेच पंचक्रोशीतील नागरिक हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.