चोरीला गेलेली बेलोरा गाडी चा शोध लावला पोलीसानी
तळणी : प्रतिनिधी रवि पाटील
तळणी येथील चोरीला गेलेल्या बोलेरो गाडीचा शोध लावण्यात मंठा तळणी पोलीस प्रशासनाला यश आले असून पूणे जिल्हातून ही गाडी ताब्यात घेऊन गाडी मालक शिवाजी राऊत यांच्याकडे ती सूपूर्द करण्यात आली जलद गतीने तपास करून व सी सी टी व्ही फुटेजचा आधारावरून गाडीचा शोध लावण्यात आला असून या कामगीरी मुळे मंठा तळणी पोलीसांचे कौतूक होत आहे दि २२ २ २०२२ रोजी तळणी येथील कांपड दुकान बँक व बोलेरो चोरी प्रकरणी विविध कलमाखाली मंठा पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता घटना घडल्या पासून पोलीसांच्या विविध प्रकारच्या यंञणा कामाला लागल्या होत्या सराईत गुन्हेगारानी गांडीची नंबर प्लेट बदलल्याने पोलीसांसमोर या गाडीचा शोध लावणे कठीण होते
मंठा तालुक्यातून एकाच दिवशी दोन बोलेरो गाडीची चोरी झाल्याने गुन्हे दाखल झाले होते पोलीसाच्या जलद तपासाने व सीसी टीव्ही फुटेजची मोठी मदत झाली असुन चोरट्याना सुध्दा लवकरच अटक करण्यात येईल गाडी मालंकाना गाडी सुपूर्द करण्यात आली असल्याची प्रतिक्रीया मंठा पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांनी दील
सदरील कार्यवाही ही मा पोलिस अधिक्षक श्री विनायक देशमुख, मा अप्पर पोलिस अधिक्षक श्री विक्रांत देशमुख,उपविभागीय पोलिस अधिकारी श्री राजु मोरे, पोलिस निरिक्षक श्री संजयजी देशमुख ,पो उप निरीक्षक आसमान शिंदे,व पो उप निरीक्षक बालभिम राऊत, यांच्या मार्गदर्शनाखाली पो हे काॅं सुभाष राठोड सोपान चव्हाण पोलीस आमलदार शाम गायके संतोष बनकर विलास कातकडे मनोज काळे सतीश अमटे संदीप घोडके दीपक आढे प्रशांत काळे विलास जुबंडे यांनी केली
मंठा तळणी पोलीसानी गाडीचा लवकर शोध लावून मोठे सहकार्य केले चार दीवसात गाडीचा ताबा दील्याने पोलीसांवरचा विश्वास आणखी वाढल्याची प्रतिक्रीया गाडी मालक शिवाजी राऊत यानी दीली