मंठा येथे ग्रामसेवकावर गुन्हा दाखल


मंठा -(सुभाष वायाळ )दि.१७ माहिती अधिकार कायदयाला अधिकारी कर्मचारी वर्ग महाराष्ट्रात जुमानत नसताना दिसून येत आहे.माहिती अधिकार कायद्याप्रमाणे अर्जदाराने मागितलेली माहिती देणे कर्तव्य असताना, माहिती दिली नाही म्हणून एका ग्रामसेवकावर मंठा पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
याबाबत थोडक्यात माहिती अशी, जनमाहिती अधिकारी तथा तत्कालीन ग्रामसेवक अनिल तुकाराम चव्हाण याने माहिती अधिकारात मागितलेली माहिती दिली नाही. याबाबत अर्जदाराने राज्य माहिती आयुक्त औरंगाबाद खंडपीठाकडे आपला अर्ज केला आणि माहिती देण्यासाठी टाळाटाळ होत असल्याबाबत तक्रार केली. राज्य आयुक्त औरंगाबाद यांनी सदर घटनेची दखल घेऊन संबंधित ग्रामसेवकास वेळेत माहिती दिली नाही म्हणून सात हजार दंड आणि सात दिवसात माहिती देण्यासाठी आदेशित केले. परंतू सदर ग्रामसेवकाने राज्य आयुक्त औरंगाबाद यांच्याही आदेशाचे जाणीवपूर्वक उल्लंघन केले. म्हणून येथील पंचायत समिती विस्तार अधिकारी विजयकुमार प्रल्हाद पाटील यांच्या तक्रारीवरून हिवरखेडा येथील तत्कालीन ग्रामसेवक अनिल तुकाराम चव्हाण यांच्याविरोधात मंठा पोलिसात गुन्हा दाखल केला आला आहे.

Popular posts from this blog

लाच स्वीकारताना कारला येथील ग्रामसेवक घुगे यांना रंगेहाथ पकडले

रायगव्हाण येथे शिव महापुराण कथेची अति उत्साहात सांगता....

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत