परतूर येथे गजानन महाराज प्रगट दिनानिमित्त मंदाताई लोणीकर यांच्या विविध ठिकाणी भेटी
परतूर प्रतिनिधी हनुमंत दवंडे
दि 23 बुधवार रोजी श्री गजानन महाराज प्रगट दिनानिमित्त शहरात विविध भागात गजानन महाराज यांचे विविध ठिकाणी पारायण ठेवण्यात आले होते यासोबतच बऱ्याच ठिकाणी भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते या पारायणाच्या ठिकाणी व भंडारा च्या ठिकाणी माजी मंत्री बबनरावजी लोणीकर यांच्या सुविद्य पत्नी मंदाताई लोणीकर यांनी अनेक ठिकाणी भेटी देऊन शुभेच्छा दिल्या व भंडार यांचा आस्वाद घेतला
यावेळेस त्यांच्यासोबत भारतीय जनता पार्टीचे माजी शहराध्यक्ष तथा नगरसेवक प्रकाश चव्हाण,नगरसेवक कृष्णा आरगडे, नगरसेवक प्रवीण सातोनकार यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे विविध पदाधिकारी उपस्थित होते
Comments
Post a Comment