प्रत्येक जिल्ह्यात ‘एमआरआय’; तालुक्यांत ‘सीटी स्कॅन’, ‘डायलिसिस’’_राजेश टोपे (आरोग्यमंत्री तथा कुटुंबकल्याण मंत्री महाराष्ट्र राज्य)
परतूर प्रतिनिधी हनुमंत दवंडे
राज्यातील प्रत्येक जिल्ह्याला एमआरआय स्कॅनिंग, तर 50 ते 100 खाटांपर्यंतच्या तालुकास्तरावरील सर्वच उपजिल्हा, ग्रामीण रुग्णालय, आरोग्य केंद्रांना सीटी स्कॅन आणि डायलिसिससह सोनोग्राफीची सेवा मोफत उपलब्ध करून दिली जाणार आहे. ही घोषणा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केली. बाह्य यंत्रणेकडून दिल्या जाणार्या या सुविधांची निविदा काढली आहे. येत्या दोन-तीन महिन्यांत प्रत्यक्ष या सुविधा उपलब्ध होतील, अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली.
आरोग्यसेवेकडे अनेक वर्षे दुर्लक्षच झालेले आहे, असे सांगत टोपे म्हणाले, सरकार कोणाचेही असो, आरोग्यावर आवश्यक निधी खर्च झालेला नाही. किमान पाच टक्के निधी खर्च व्हावा, असे आयोगाकडून वारंवार सांगण्यात येत होते. प्रत्यक्षात मात्र एक टक्काही खर्च होत नव्हता. कोरोनामुळे आता परिस्थिती ब