छत्रपती शिवाजी महाराज डोक्यावर नाही तर डोक्यात घेण्याचा विषय - प्रा.सहदेव मोरे पाटील
प्रतिनिधी हनुमंत दवंडे
छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य सर्व जाती-धर्माच्या सर्वसामान्य माणसासाठी होतं छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीही जातीभेद केला नाही कधीही अंधश्रद्धेला थारा दिला नाही उलट शिवरायांच्या काळात आया बहिणीचे रक्षण आणि गोरगरीब शेतकरी शेतमजूर इत्यादींच्या कल्याणासाठी काम करणारा राजा म्हणून शिवकल्याणरजा अशी उपाधी मिळाली होती त्यामुळे आपणही शिवरायांच्या विचारांची पाईक बनवून त्या विचारांना साजेशी शिवजयंती साजरी करावी कारण छत्रपती शिवाजी महाराज हा डोक्यावर घेण्याचा विषय नसून डोक्यात घेण्याचा विषय आहे असे प्रतिपादन निपाणी पोखरी येथे शिवजयंती उत्सवानिमित्त आयोजित व्याख्यान प्रसंगी शिवव्याख्याते प्रा सहदेव मोरे पाटील यांनी केले
यावेळी पोखरी निपाणी ग्रामपंचायतीच्या वतीने शिवजन्मोत्सवाचे औचित्य साधून मोजपुरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री विलास मोरे यांना शिवछत्रपती ग्रामविकास जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी प्रा रंगनाथ खेडेकर भाजपा जालना तालुकाध्यक्ष प्रकाश टकले गजानन उफाड बाबुराव खरात कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रवीण पवार नारायण मगर परीक्षेत शिंदे रामेश्वर भुतेकर सुरेश कदम भागवत राऊत राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष दिलीपराव भुतेकर गणेश कदम गणेश लोखंडे बद्रीनाथ खांडेभराड पांडुरंग पोहेकर रमेश जोशी पुंजाराम कदम उमेश मोहिते नारायण मोहिते गजानन खांडेभराड एकनाथ भुंबर जगन्नाथ घोडके भरत कदम नामदेव ढाकणे देवराव गायकवाड अनिल चव्हाण सुधाकर उबाळे सुभाष बागल यांची प्रमुख उपस्थिती होती.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या विविध पैलूंचा शिवजयंतीच्या निमित्ताने आपण सर्वांनी अभ्यास करणे गरजेचे असून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन कार्य प्रत्येक लहानथोर मंडळींसाठी अत्यंत प्रेरणादायी आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासातून आपल्याला प्रेरणा देऊ शकली नाही अशी एकही बाब शिवरायांच्या इतिहासात नाही त्यामुळे प्रत्येक प्रश्नाचं उत्तर छत्रपती शिवाजी महाराजांचे इतिहासात तुम्हाला सापडेल असेही पुढे बोलताना प्रा सहदेव मोरे पाटील म्हणाले
ज्या ज्या वेळी आपण एखाद्या प्रचंड मोठ्या अडचणीत सापडतो त्यावेळेला शिवछत्रपतींचा पन्हाळगडाहून सुटका ते थेट विशालगडावर पोहोचण्याचा चित्तथरारक इतिहास आठवावा, एखाद्या जीवघेणा संकट समोर असेल तर त्यातून कसं निष्ठावंत हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतापगडावरील रणसंग्रामातून शिकावं, आपल्या आजूबाजूची माणसे किती निष्ठावान आणि जीवाला जीव देणारे असावीत याचा विचार करायचा असेल तर संभाजी कावजी कोंढाळकर तानाजी मालुसरे हंबीरराव मोहिते जिवाजी महाले शिवा काशीद नेताजी पालकर प्रतापराव गुजर बहिर्जी नाईक हिरोजी इंदलकर यासारख्या मर्द मावळ्यांचा इतिहास अभ्यासावा. शिवरायांच्या प्रेरणेने जगभरातील मोठमोठी युद्ध जिंकली केली असून देशाबाहेर देखील व्हिएतनाम सारख्या देशात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक अगदी दिमाखात उभी आहेत ही बाब अत्यंत अभिमानास्पद आहे असेही यावेळी मोरे पाटील यांनी आपल्या व्याख्यानात स्पष्ट केले
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी निपाणी पोखरी ग्रामपंचायत सरपंच गणेश आडागळे उपसरपंच सविता भुतेकर ग्रामपंचायत सदस्य रंगनाथ भुतेकर कासाबाई भुतेकर यमुना भुतेकर वंदना सोळुंके रोहिणी कुलकर्णी यांच्यासह विलास भुतेकर सुधाकर भुतेकर दिनकर भुतेकर रेणुकादास कुलकर्णी विश्वनाथ तिकांडे पांडुरंग भुतेकर बालासाहेब कुलकर्णी सावळीराम भुतेकर भगवान तिकडे रमेश देशमुख छत्रभुज नाईक नवरे नारायण भुतेकर गणेश भुतेकर राजेश भुतेकर विष्णू तिकांडे बाळासाहेब देशमुख दादाराव नाईक नवरे पंडित भुतेकर अमोल भुतेकर बद्रीनाथ नाईक नवरे दिंकर तिकांडे तिकांडे जनार्धन गबाजी मिसाळ गंगाधर कोकणे सोळुंके किशोर भुतेकर केशव भुतेकर सुरेश नाईक नवरे सुरेश तिकडे रशीद शेख भारत देशमुख अरुण को हिरे गजानन भुतेकर लक्ष्मण भुतेकर शिवदीप भुतेकर परमेश्वर भुतेकर आसाराम भुतेकर प्रकाश नाईकनवरे विठ्ठल देशमुख सुखदेव साळुंखे कृष्णा भोकरे विशाल भोकरे अशोक बुक दाणे भूषण भुतेकर संदीप भुतेकर रघुनाथ देशमुख प्रल्हाद भुतेकर बंडू शिंदे सनी भुतेकर योगेश भुतेकर श्रीमंत भुतेकर यांच्यासह अनेकांनी प्रयत्न केले