भाजयुमो शाखेच्या नामफलकाचे बाबुलतारा येथे अनावरणयुवा मोर्चा प्रदेश महामंत्री राहुल लोणीकर यांच्या हस्ते करण्यात आले अनावरण,भारतीय जनता युवा मोर्चा मध्ये युवकांना कर्तुत्व सिद्ध करण्याची संधी-प्रदेश महामंत्री राहुल लोणीकर
*
प्रतिनिधी/हनुमंत दवंडे
भारतीय जनता युवा मोर्चा मध्ये युवकांना आपले कर्तृत्व सिद्ध करण्याची संधी पक्ष स्थापनेपासूनच मिळत आली असल्याचे प्रतिपादन युवा मोर्चा प्रदेश महामंत्री राहुल लोणीकर यांनी केले
ते बाबुलतारा तालुका परतुर येथे युवा मोर्चा शाखा नामफलकाचे अनावरण समारंभ प्रसंगी बोलत होते
पुढे बोलताना ते म्हणाले की विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस स्वर्गीय प्रमोदजी महाजन स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांनी विद्यार्थीदशेमध्येच पक्षाच्या माध्यमातून काम सुरू केले होते असे सांगतानाच माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी युवा मोर्चा च्या माध्यमातून कामाला सुरुवात केली होती लोणी गावचा सरपंच ते मंत्री पदापर्यंत त्यांनी मजल मारली पक्षात काम करणाऱ्यांना निश्चित संधी मिळते असे सांगतानाच जात धर्म पंथ या गोष्टीचा कुठलाही विचार भारतीय जनता पार्टीमध्ये केला जात नसून केवळ योग्यतेच्या आधारावरच या ठिकाणी संधी मिळत असल्याचे राहुल लोणीकर यांनी स्पष्ट केले
वैचारिकदृष्ट्या प्रगल्भ असणाऱ्या संघटनेमध्ये काम करत असताना मला खूप काही शिकायला मिळाले असून या माध्यमातून जनसामान्यांची सेवा करण्याची संधी केवळ भाजपा मुळे मला मिळाली असल्याचे यावेळी त्यांनी उपस्थितांशी बोलताना सांगितले
खऱ्या अर्थाने आर्थिक क्रांतीच्या व सामाजिक क्रांतीच्या दिशेने जाण्यासाठी युवावर्गाने मोठ्या प्रमाणावर भाजपा युवा मोर्चाच्या माध्यमातून आपले योगदान देणे गरजेचे असून बलशाली भारत स्वयंपूर्ण भारत विकसित भारत या सर्व संकल्पना केवळ भाजपच्या माध्यमातून पूर्ण होऊ शकतात असे यावेळी त्यांनी नमूद केले यावेळी जिल्हा परिषद सदस्य हरीराम माने पंचायत समिती सदस्य रामेश्वर तनपुरे दिगंबर मुजमुले जगदीश पडोळकर राजेभाऊ मुळे ओमा मुळे संतोष कोळे यांची उपस्थिती होती या वेळी शाखा अध्यक्ष म्हणून शंकर मुळे, उपाध्यक्ष नामदेव कानोडे, सिताराम मुजमुले सचिन वाघमारे पंढरीनाथ मुळे सुरेश मुळे सचिव भीमराव नाईकवाडे कैलास काळे तर पंढरीनाथ मुळे हनुमान घोडके सचिन वाघमारे रामराव कावळे कैलास मुळे मदन गिरी रामकिसन काकडे आप्पासाहेब मुळे किसन घोडके शामराव मिंड गणेश राव उगले मदन मुळे रवी जाधव दत्ता जाधव यांची निवड करण्यात आली