डाँ .गोपाल तुपकर यांना सावित्रीबाई फुले भूषण पुरस्कार जाहीर


 मंठा-प्रतिनिधी /सुभाष वायाळ
      दि.22 मराठी साहित्य मंडळ तर्फे साहित्य क्षेत्रातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्याला दरवर्षी दिला जाणारा राज्यस्तरीय सावित्रीबाई फुले भूषण पुरस्कार यावर्षी मंठा येथील डॉ.गोपाळ विठोबा तुपकर यांना जाहीर झाला आहे. साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना हा पुरस्कार दिला जातो. डॉ.गोपाल तुपकर यांचे अंतरीचे शब्दफुले हा काव्यसंग्रह व इतर अनेक काव्य व लेख प्रसिद्ध झालेले आहेत.साहित्य क्षेत्रातील योगदान पाहून त्यांना हा पुरस्कार दिला जाणार आहे. राज्यस्तरीय काव्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांमध्ये हा पुरस्कार त्यांना वितरण केला जाणार आहे. ज्येष्ठ साहित्यिक डॉ.जयप्रकाश घुमटकर राष्ट्रीय अध्यक्ष मराठी साहित्य मंडळाचे त्यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे निवड झाल्याचे कळवले आहे. त्यांच्या या निवडीबद्दल त्यांचे प्रा.सतीश वैद्य, संजय भवर, मुरलीधर बोराडे, सुभाष वायाळ, भीमाशंकर तुपकर, व शैक्षणिक क्षेत्रातील आणि साहित्य क्षेत्रातील सर्वाकडून अभिनंदन होत आहे.

Popular posts from this blog

लाच स्वीकारताना कारला येथील ग्रामसेवक घुगे यांना रंगेहाथ पकडले

रायगव्हाण येथे शिव महापुराण कथेची अति उत्साहात सांगता....

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत