परतूरला रविवारी माजी सैनिकांचा मेळावा ...
=
परतूर प्रतिनिधी हनुमंत दवंडे
परतूर,दि.२५ - शहरात रविवारी (दि.२७) माजीसैनिकांचा मेळावा आयोजित करण्यात आला असल्याची माहिती माजीसैनिक संघटनेच्या वतीने देण्यात आली.
याबाबत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी एका पत्रकाद्वारे कळविले आहे की, शहरातील वरद विनायक मंगल कार्यालयात रविवारी मराठवाड्यातील माजी सैनिकांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ११ वाजता हा मेळावा होणार आहे. तत्पूर्वी सकाळी १० वाजता महादेव मंदिर चौक ते वरद विनायक मंगल कार्यालय या मार्गावर माजीसैनिकांची वाजत-गाजत मिरवणूक काढण्यात येणार आहे.
मेळाव्याला उपस्थित राहावे असे आवाहन माजीसैनिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रशांत राखे,सचिव तुकाराम उबाळे तथा उपाध्यक्ष प्रकाश हिवाळे यांनी केले आहे.