ब्राईट स्टार इंग्लिश स्कूल चा विद्यार्थी शेख अब्दुल रहीम. एमबीबीएस प्रवेशासाठी पात्र...
परतूर प्रतिनिधी/ हनुमंत दवंडे
ब्राईट स्टार इंग्लिश स्कूल परतूर या माध्यमिक विद्यालयात ज्युनियर के. जी. ते इ 10 वी पर्येंत शिक्षण घेतलेल्या शेख अब्दुल रहीम हुसेन* यांनी नीट परीक्षेत 566 गुण घेत शासकीय मेडिकल कॉलेज , गोंदिया येथे (MBBS)* साठी प्रवेश मिळाल्याबद्दल ब्राईट स्टार इंग्लिश स्कूल, परतूर येथे शेख अब्दुल रहीम व त्यांचे बंधू श्री अब्दुल्ला सर* यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी रहीम ला ब्राईट स्टार ची Academic excellence ही ट्रॉफी प्रदान करण्यात आली. याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक श्री खणके सर,शेख सर, राम सर, कुकडे सर, सय्यद सर,अंभुरे मॅडम,सकलेचा मॅडम, गिरी मॅडम हे सर्व शिक्षकवृंद उपस्थित होते.शेख अब्दुल राहिम ने हे यश संपादन केल्याबद्दल श्री राजबिंडे सर, श्री शब्बीर सर , श्री भालेराव सर शाळेचे मुख्याध्यापक श्री खणके सर तसेच सर्व शिक्षकवृंद यांनी अभिनंदन केले आहे.