मंठा येथे छत्रपती खा.संभाजी राजे वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर संपन्न



 मंठा(सुभाष वायळ )दि.06 मंठा येथे छत्रपती खा.संभाजी राजे यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी कोरोनाचे सर्व नियमाचे पालन करून सामाजिक उपक्रम व भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन श्री.स्वामी समर्थ ब्लड सेंटर जालना व आयोजक सामाजिक कार्यकर्ते  कुलदीप बोराडे मित्र मंडळ यांच्या तर्फे करण्यात आले होते. मानवी रक्त कारखान्यात किंवा प्रयोगशाळेत तयार करता येत नाही. मानवी रक्तास अजून पर्यंत पृथ्वीतलावर काही पर्याय नाही. रक्त तयार होते फक्त निरोगी मानवी शरीरात आपल्या संस्कृतीमध्ये दानास खूप महत्त्व आहे. गोदान, अन्नदान,भूदान या दानामुळे जीव जगू शकतो. परंतु रक्तदानामुळे जीव वाचू शकतो. त्यामुळे प्रत्येक निरोगी व्यक्‍तीने रक्तदान करावे. अपघाताने धोक्यात सापडता प्राण, रक्त मिळताच मिळे जीवदान,ठेवूनिया सामाजिक जाण, पुण्यकर्म करावे करुनी रक्तदान या उक्तीप्रमाणे  रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान या सामाजिक जाणिवेतून मंठा परिसरातील नागरिकांनी रक्तदानास मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला. रक्तदान शिबिरामध्ये एकूण 30 नागरिकांनी रक्तदान केले. रक्तदान शिबिराचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते कुलदीप बोराडे, मित्र मंडळ, श्री स्वामी समर्थ ब्लड सेंटर चे कर्मचारी अधिकारी यांनी श्रम घेतले.यावेळी आयोजक सामाजिक कार्यकर्ते कुलदीप बोराडे व श्री स्वामी समर्थ ब्लड सेंटरचे अधिकारी यांनी रक्तदात्यांचे आभार मानले.

Popular posts from this blog

लाच स्वीकारताना कारला येथील ग्रामसेवक घुगे यांना रंगेहाथ पकडले

रायगव्हाण येथे शिव महापुराण कथेची अति उत्साहात सांगता....

सकल राजस्थानी समाज नवरात्र महोत्सवच्या अध्यक्ष पद्दी शरद भारुका तर सचिव: शुभम चित्तोडा यांची निवड