कर्नावळ येथे अवैध गारगोटी गौण खनिजाचा साठा जप्त
मंठा प्रतिनिधी(सुभाष वायाळ )दि.१५ मंठा तालुक्यातील कर्नावळ येथे मंठा पोलीस यांना गुप्त बातमीदार मार्फत माहिती मिळाली की, कर्नावळ शिवारामध्ये संशयित आरोपी रमेश गणपत चव्हाण यांच्या शेतामध्ये गारगोटी चमकणारा ओबड दोबड दगडाची विनापरवाना बेकायदेशीररित्या साठवणूक केलेली माहिती मिळताच मंठा पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांच्या पथकाने पो.कॉ.आडे,पो.कॉ.ढवळे,पो.कॉ. ईलग यांनी सदरील साठा जप्त केला आहे. व अंदाजे याचे वजन चार टन असून याची बाजार भाव किंमत एक लाख रुपये एवढी आहे. पोलीस उपनिरीक्षक बलभीम राऊत यांच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी विरुद्ध गुन्हा नोंद केला आहे. व पुढील तपास स.पो.उप.नी. केंद्रेेेे करत आहेत.