उद्या शिवरायांच्या विचारांच सरकार सत्तेत येईल, त्यावेळी सगळा हिशोब चुकता करू - माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांचा राज्य सरकारला इशारा,पक्ष पाहून पुतळ्यांची परवानगी ही बाब महाराष्ट्राच्या अस्मितेला धक्का पोहोचवणारी - लोणीकर,वाटुर फाटा येथील रास्ता रोको दरम्यान तब्बल तीन तासांपेक्षा अधिक काळ वाहतूक बंद परतूर येथे शिवरायांचा भव्य पुतळा उभारणार - लोणीकर यांचे वक्तव्य
परतूर प्रतिनिधी/हनुमंत दवंडे
राज्य सरकार राष्ट्रपुरुषांचे पुतळे उभा करण्यात परवानगी देत नाही म्हणुन लोक पुतळे उभे करतात.छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे सरकारने परवानगी दिला नाही तरी लोकच पुतळे उभारत आहे.काही दिवसांपूर्वीच बसवण्यात आले आहेत परंतु केवळ राजकीय द्वेषापोटी सेवली येथील भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी पुतळा बसवला म्हणून भावनेने गुन्हे दाखल करण्यात आले आहेत परंतु प्रत्येकाची वेळ येत असते आज बेईमान लोकांच सरकार सत्तेत आहे उद्या पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांच सरकार सत्तेत येईल त्यावेळी या सर्व बाबींचा हिशोब चुकता करू असा इशारा देखील माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी यावेळी दिला
वाटुर फाटा येथे आयोजित रास्ता रोको आंदोलन प्रसंगी माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर बोलत होते यावेळी भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश महामंत्री राहुल भैया लोणीकर तालुकाध्यक्ष रमेश भापकर सतीश निर्वळ प्रकाश टकले गणेशराव खवणे माऊली शेजुळ
संदीप भैय्या गोरे नागेशराव घारे राजेश मोरे
हरिराम माने बीडी पवार रंगनाथ येवले शहाजी राक्षे बद्रीनारायण ढवळे विक्रम माने गणपतराव वारे नाथराव काकडे रामेश्वर तनपुरे दिगंबर मुजमुले शिवाजी पाईकराव अंकुश कदम प्रदीप ढवळे सिद्धेश्वर सोळंके यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी रास्ता रोको मुळे तब्बल तीन तासांपेक्षा अधिक काळ जालना नांदेड हायवे वरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती वाटुर जालना रोडवर यदलापुर पर्यंत तर वाटूर मंठा रोडवर केंदळी पर्यंत वाहनांच्या रांगा लागलेल्या होत्या
छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन सत्तेत आलेले लोक मोगलाई प्रवृत्तीचे निघाले असून शिवरायांचे नाव घेऊन अन्याय आणि अत्याचार करणारे मिळेलच सत्तेत बसलेले आहेत छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं आणि शिवरायांच्या पुतळ्याला चोरासारखा रातोरात हलवायचं असा घाट राज्य सरकारने घातला असून हे सरकार वसुली करणारे तर होतेच परंतु आता पूर्णतः शिवद्रोही आहे प्रसिद्ध झाले आहे अशा शब्दात माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी सरकारचा खरपूस समाचार घेतला
पुतळा उभारण्यासाठी मा.सर्वोच्च न्यायालय यांनी काही नियम व अटी घालून दिलेल्या असला तरी त्यासाठी परवानगी मागितल्यानंतर मात्र राजकीय दबाव आणून प्रशासनाला वेठीस धरले जात आहे परिणामी पक्ष पाहून शिवरायांच्या पूतळा उभारणीला परवानगी देण्याचे महापाप सरकार करत आहे भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकार्यांनी पुतळा परवानगी मागितली तर त्यांना वर्ष-वर्ष परवानगी दिली जात नाही संशयित म्हणून सर्वसामान्य गोरगरीब शिवप्रेमी तरुणांवर गुन्हे दाखल केले जात आहेत ही बाब हे सरकार शिवशाहीचे नसून मोगलाई प्रवृत्तीचा असल्याचे सिद्ध करते अशी टीका देखील यावेळी माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी केली
मा.सर्वोच्च न्यायालयाच्या नियम अटीच्या अधीन राहून सरकारने लवकरात लवकर पुतळ्याची परवानगी देण्याची गरज असून हे सरकार सत्तेत आल्यापासून कोणत्याही पुतळ्याला सरकारने परवानगी दिलेली नाही या सरकारला परवानगी देण्याचा मुहुर्त सापडत नसेल तर सरकारने पंचांग पहावे असा टोलाही यावेळी लोणीकर यांनी लगावला जर राष्ट्रीय महापुरुषांचे पुतळे बसवायचे नाहीत तर मग सत्तेत असणाऱ्या पक्षांच्या नेत्यांचे पुतळे बसवायचे का? असा सवाल देखील लोणीकर यांनी यावेळी उपस्थित केला
महा विकास आघाडीचे सरकार दळभद्री सरकार असून स्वतःच्या स्वार्थासाठी घराघरात तरुणाईला बिघडवण्यासाठी वाईन खुली करण्याचा दुर्दैवी निर्णय घेतला असून यामुळे अगदी कमी वयात तरुणांना व्यसनाधीन बनवण्या चा सरकारचा दावा असून या निर्णयामुळे तरुण वयातच अनेक भगिनींना आपले कुंकू पुसन्याची वेळ येणार आहे सरकार हे पाप कुठं फेडणार अशा तीव्र शब्दात संताप व्यक्त करत सरकारने हा निर्णय त्वरित मागे घ्यावा यासाठी विधानसभेत सरकारला जाब विचारणार असून कोणत्याही परिस्थितीत हा निर्णय मागे घेण्यास भाग पाडू असेही लोणीकर यांनी यावेळी स्पष्ट केले
*येथे पाहिजे जातीचे येरागबाळ्याचे काम नोहे*
तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात जालना जिल्ह्याचा पालकमंत्री असताना आंबड येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या बसलेला पुतळा प्रशासनाने काढण्याचा प्रयत्न केला त्यावेळी छातीठोकपणे काहीही झाले तरी पुतळा हटवला जाणार नाही अशी ठाम भूमिका आपण घेतली होती त्यामुळे आजही शिवरायांचा अंबड शहरातील पुतळा डौलाने उभा आहे त्यासाठी इच्छाशक्ती लागते चाळीस वर्ष मराठा समाजाचा मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला आरक्षण मिळू शकले नाही परंतु देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जी इच्छाशक्ती होती त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण मिळाले होते हे सरकार केवळ वसुली करण्यासाठी स्थापन झालेल्या सरकार असून थांबू नका हे सरकार देऊ शकत नाही त्यामुळे "येथे पाहिजे जातीचे येरा गबाळ्याचे काम नोहे" अशा शब्दात लोणीकर यांनी राज्य सरकारचा समाचार घेतला
*परतूर येथे उभारणार शिवरायांचा भव्यदिव्य अश्वारूढ पुतळा*
परतुर येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा व्हावा अशी तमाम शिवप्रेमींची इच्छा असून नियमाच्या चौकटीत बसवून सुप्रीम कोर्टाने दिलेल्या अटी व शर्तीच्या अधीन राहून लवकरात लवकर भव्यदिव्य असा शिवरायांचा अश्वारुढ पुतळा उभारण्यासाठी आपण सर्वस्वी प्रयत्न करणार असल्याचे यावेळी लोणीकर यांनी स्पष्ट केले यावर प्रचंड टाळ्यांचा कडकडाट करत परतूर येथे पुतळा झालाच पाहिजे अशी साद उपस्थित शिवप्रेमी तरुण बांधवांनी दिली..
छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राची अस्मिता असून अखंड हिंदुस्थानचे आराध्यदैवत आहे छत्रपती शिवाजी महाराज अनेक तरुण तरुणींसाठी प्रेरणा पुरुष आहेत त्यांचा भव्य दिव्य असणारे स्मारक अनेकांना प्रेरणा देत असते परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने सत्तेतून शिवद्रोही करणाऱ्या सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे हटवण्याचे षडयंत्र रचले असून या षडयंत्राला शिवप्रेमी तरुण भीक घालणार नाही, छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारत अशा शब्दात भाजयुमोचे प्रदेश महामंत्री राहुल लोणीकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या
राज्य सरकारवर केलेल्या घणाघाती हल्ला करताना राहुल लोणीकर पुढे म्हणाले की तमाम शिवप्रेमी युवक एकवटला असून या शिवद्रोही सरकारला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही असा संकल्प तरुणांनी केला आहे अशा परिस्थितीत सरकारने तरुणांवर खोटे गुन्हे दाखल करणे बंद करावे असे एक नाही हजारो गुन्हे दाखल केले तरी शिवप्रेमी तरुण डगमगणार नाही
राजकीय पोळी भाजण्यासाठी शिवरायांचे नाव घेऊन केवळ राजकारण करणाऱ्या लोकांची छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेण्याची लायकी नाही रात्रीच्या अंधारात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवणे ही राज्य सरकारची नामर्दांगी आहे शिवरायांनी सर्व जाती धर्माच्या लोकांसाठी कार्य केला असून शिवछत्रपती सर्व जाती-धर्माच्या लोकांचे आदर्श आहेत या आदर्शावर घाला घालण्याचं काम राज्य सरकारने केला असून वसुलीची माज आणि मस्ती एवढी प्रचंड वाढली आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवण्यात पर्यंत या नालायक सरकारची मजल गेली आहे अशा कठोर शब्दात प्रा.सहदेव मोरे पाटील यांनी सरकारचा समाचार घेतला
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सैन्यात अनेक मुस्लिम सरदार होते त्यांचे अंगरक्षक म्हणून देखील अनेक मुस्लीम सैनिकांनी जीवाला जीव दिला अशा परिस्थितीत जोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभा राहत नाही तोपर्यंत शिवरायांचा मुस्लिम मावळा म्हणून मी देखील स्वस्थ बसणार नाही जेव्हा जेव्हा आवश्यकता पडेल त्या त्यावेळी मुस्लिम समाजाचा प्रतिनिधी म्हणून मी किंवा संपूर्ण समाज नेहमीच पुढाकार घेईल अशा शब्दात कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मुस्तफा पठाण यांनी सरकारच्या नाकर्त्यापणाच्या भूमिकेवर आपले मत व्यक्त केले
छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवून राज्य सरकारने सर्व जाती-धर्माच्या लोकांच्या भावना दुखावल्या आहेत छत्रपती शिवाजी महाराज हे सर्व धर्माचे आदरस्थान आहेत त्यामुळे लवकरात लवकर तो पुतळा पुन्हा आहे त्या स्थितीत आहे त्याच ठिकाणी पुन्हा मानसन्मानाने उभा करावा अन्यथा याहीपेक्षा आक्रमक आंदोलन करावा लागेल अशा भावना दलित आघाडीचे यांनी व्यक्त केल्या या वेळी शिवशाहीर पद्माकर कवडे यांनी आपल्या बुलंद आवाजात पोवाडा सादर केला
यावेळी विठ्ठलराव काळे सुधाकर सातोनकर नवनाथ खंदारे राजू दादा वायाळ नरसिंग राठोड प्रसादराव गडदे अण्णासाहेब ढवळे शाहीर पद्माकर कवडे सुरेश सोळंके शत्रुघ्न कणसे संपत टकले नितीन सरकटे अशोक राठोड नवनाथ चटे विक्रम उफाड अविनाश राठोड मुस्तफा पठाण विलास घोडके मदनराव तौर कृष्णा आरगडे प्रवीण सातोनकर दीपक दवणे आनंद वैद्य रावसाहेब वैद्य एकनाथ जाधव विवेक काकडे जितेंद्र सरकटे गजानन शिंदे रवी सोळंके बंडू मानवतकर ज्ञानेश्वर सोळंके बबलू सातपुते विठ्ठल बिडवे माऊली गोडगे राजेभाऊ खराबे नारायण बिडवे संतोष बोराडे बाळासाहेब पवार शिवाजी पाईकराव उद्धव वायाळ संभाजी वारे जगदीश पदुळकर माधवसिंग जनकवार इस्माईल पठाण शुभम आडे राजेभाऊ कदम कल्याण उबाळे विश्वंभर शेळके कैलास बोनगे कैलास उफाड गुलाब सावंत सतीश लोमटे गणेश सोळंके गोपीचंद पवार रमेश आढाव संभाजी काकडे भागवत डोंगरे भागवत देशमुख नवनाथ चट्टे प्रफुल्ल शिंदे किरण देशमुख शिवशंकर डोईफोडे अजय तरासे सुरेश शेळके कैलास चव्हाण गंगाराम हावळे सोपान खरात सुभाष बागल ओम मुळे ओमप्रकाश बोरकर सूर्यभान कदम केशव ढवळे रामेश्वर चव्हाण बाळासाहेब खंडागळे उपसरपंच गायकवाड सोपान वायाळ अरुण खवणे संतोष कोळे दिगंबर अवचार यांच्यासह हजारोच्या संख्येने शिवप्रेमी तरुण उपस्थित होते..!!