परभणी महानगर भाजपने केली नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी...
परभणी प्रतिनिधी /हनुमंत दवंडे
महाराष्ट्र राज्याचे अल्पसंख्याक मंत्री व परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री यांना काल ED नी अटक केली त्यांच्यावर 1993 साली झालेल्या बॉम्ब स्फोटातील आरोपी दाऊद इब्राहिम यांच्या जमीन देवाण घेवाण प्रकरण मध्ये नवाब मलिक यांचे हात असून त्यांना 3 मार्च पर्यंत कोठडी दिली आहे या प्रकरणी आज परभणी भाजपा महानगरच्या वतीने परभणी जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन नवाब मलिक यांचा मंत्री पदाचा राजीनामा घेण्यात यावा व त्यांच्या वर देशद्रोहा चा गुन्हा दाखल करण्यात यावा असे निवेदन मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात आले.
यावेळी एन. डी. देशमुख,संजय रिझवानी, अतिक पटेल, दिनेश नरवाडकर, कमलकिशोर अग्रवाल,प्रदीप तांदळे,शकुंतला मठपती,छाया मोगले,विजया कातकडे,विजय गायकवाड,संजय कुलकर्णी,संतोष जाधव,रामदास पवार, अनंता गिरी, संदीप शिंदे, दीपक शिंदे, नीरज बुचाले, माऊली कोपरे व मोहम्मद गौस आदीच्या स्वाक्षरी आहेत....