सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

रमाबाई आंबेडकर - एक प्रेरणा स्त्रोत. - सुरेश पाटोदकर.

परतूर प्रतिनिधी /हनुमंत दवंडे
रमाबाई आंबेडकर यांचे सर्व जीवन त्यागाचे व समर्पणाचे होते. अनंत अडचणींचा सामना करीत धिरोदात्तपणे रमाबाईंनी डाॕ.बाबासाहेब आंबेडकरांना  साथ दिली. त्यांचे संपुर्ण जिवन आपल्याला सदैव प्रेरणा देत राहील. असे प्रतीपादन मुख्याध्यापक सुरेश पाटोदकर यांनी केले. 

    श्री समर्थ मा.विद्यालयात स्व.लता मंगेशकर यांना श्रध्दांजली व रमाई आंबेकर यांना जयंती निमीत्त अभिवादन कार्यक्रमात ते बोलत होते.

कार्यक्रमाचे सुरुवातीला विद्यार्थ्यांनी स्व.लतादिदीना श्रध्दाजंली अर्पण केली.
शिक्षक विद्यानंद सातपुते यांनी स्व. लतादिदी व रमाई आंबेडकरांचे जिवनातील अनेक प्रसंग विद्यार्थ्यांना सांगुन त्यांचेकडुन आपण प्रेरणा घेतली पाहीजे असा आग्रह  केला.
प्रास्ताविक धनंजय जोशी तर आभार प्रदर्शन पाराजी रोकडे यांनी केले.
कार्यक्रमास मोठ्या संख्येने विद्यार्थी व कर्मचारी ऊपस्थीत होते.
------------------------------ -------

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत