एच .एस. सी .बोर्ड कडून आज बारावीच्या ऑफलाइन परीक्षेचे प्रवेशपत्र मिळणार.
कोरोनामुळे गेल्या सुमारे दोन वर्षांमध्ये दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षा चा खेळखंडोबा झाला आहे. या वाढत्या प्रादुर्भावामुळे बोर्डाच्या परीक्षा रद्द कराव्या लागल्या आहेत त्यात यावर्षीही अनेक महिने शिक्षण ऑनलाइन पद्धतीने देण्यात येत आहे त्यामुळेच एका बाजूनं ऑफलाइन परीक्षांना विद्यार्थी विरोध करत आहेत .तर राज्य सरकारनही बोर्डाच्या परीक्षा ऑफलाईन असच होणार याबाबत भूमिका स्पष्ट केली आहे त्यानुसार आता येणाऱ्या मार्च महिन्यामध्ये बारावीची परीक्षा होणार आहे म्हणूनच स्टेट बोर्डातर्फे बारावी परीक्षेचे प्रवेशपत्र उपलब्ध करून देण्यात येणार आहेत दहावी आणि बारावीच्या परीक्षा या ऑनलाइन पद्धतीने घेण्यात याव्यात यासाठी विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं होतं मात्र यानंतरही राज्य सरकारने बोर्डाच्या परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घेण्यात येणार असं ठामपणे सांगितलं होतं यंदाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आला आहे त्यानुसार मार्च-एप्रिलमध्ये बारावीची परीक्षा तर एप्रिल-मे मध्ये दहावीची परीक्षा होणार आहे यातील बारावीच्या परीक्षेसाठी प्रवेश पत्र म्हणजे हॉल तिकीट आज उपलब्ध करून दिले जाणार आहेत.