केंद्र सरकारचा बजेट अपंगासाठी निराशाजनक-प्रवीण रघुनाथ ढवळे जालना जिल्हा महासचिव अपंग जनता दल सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य
परतूर प्रतिनिधी/ हनुमंत दवंडे
केंद्र सरकारने सन 2022 -23 चा वार्षिक बजेट संसद मध्ये मांडला असून या बजेटमध्ये अपंगांना काही मिळेल अशी आशा होती. कारण कोरोना काळामध्ये अपंगावर खूप मोठे संकट निर्माण झाले होते. अपंग बेरोजगारांचे व्यवसाय सुद्धा सर्व बंद पडले असून या केंद्र सरकारच्या बजेट मध्ये अपंगांना आर्थिक मदत मिळेल अशी अपेक्षा अपंगांनी केली होती .पण बजेट मध्ये अपंगाना निराशा मिळाली आहे असे प्रतिपादन प्रवीण रघुनाथराव ढवळे जालना जिल्हा महासचिव अपंग जनता दल सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य यांनी म्हटले आहे.