परतूर पोलीस स्टेशन येथे शांतता कमिटीची बैठक संपन्न...


परतूर प्रतिनिधी/हनुमंत दवंडे
छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सवाच्या निमित्ताने शांतता समितीची बैठक परतूर पोलीस स्टेशन येथे घेण्यात आली. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा.उद्धवजी ठाकरे साहेब यांनी कोरणा संदर्भामध्ये शिवजयंतीच्या उत्सव साजरा करण्यासाठी काही गाईडलाईन्स दिलेल्या आहेत. त्यामध्ये शिवभक्त शिवज्योत घेऊन जाण्यासाठी 200 लोकांना परवानगी देण्यात आलेली आहे तसेच पाचशे लोकांनी एकत्र येऊन शिवजयंतीचा उत्सव साजरा करावा असे दिलेल्या परिपत्रकात म्हटले आहे याच अनुषंगाने परतूर पोलीस स्टेशन येथे समता, बंधुता, न्याय, या मूलभूत हक्क याची अंमलबजावणी आपण केली पाहिजे आणि शांततेत शिवजयंती उत्सव आपण साजरी करावी .असे परतूर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्याम सुंदर कौठाळे  यांनी शांतता बैठकीमध्ये सांगितले .या शांतता बैठकीला उपस्थित म्हणून रमेश  सोळंके राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष परतूर, अशोक रावआघाव शिवसेना तालुकाध्यक्ष परतुर ,बाबाजी गाडगे काँग्रेस तालुकाध्यक्ष, संदीप दादा बाहेकर, रमेश भापकर तालुका अध्यक्ष भाजपा ,शत्रुघन कणसे पाटील युवा मोर्चा तालुका अध्यक्ष भाजपा ,राहिमोदिन कुरेशी, प्रकाश चव्हाण नगरसेवक, कृष्णा आरगडे, नगरसेवक प्रवीण  सातोनकर  , लक्ष्मण बीलारे कृष्णा सोळंके महाराष्ट्र नवनिर्माण सेना तालुकाध्यक्ष ,परतुर विदुर जईद, योगेश गाते, व पत्रकार बंधु, उत्सव समितीचे पदाधिकारी या वेळी उपस्थित होते.

Popular posts from this blog

लाच स्वीकारताना कारला येथील ग्रामसेवक घुगे यांना रंगेहाथ पकडले

रायगव्हाण येथे शिव महापुराण कथेची अति उत्साहात सांगता....

सकल राजस्थानी समाज नवरात्र महोत्सवच्या अध्यक्ष पद्दी शरद भारुका तर सचिव: शुभम चित्तोडा यांची निवड