राष्ट्रीय चर्मकार महासंघ मंठा तालुका अध्यक्ष पदी अंबादास घायाळ यांची निवड
दिनांक 8 फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय चर्मकार महासंघ मंठा शहर यांच्यावतीने मीटिंग आयोजित केली होती ही मिटिंग जालना जिल्हा उपाध्यक्ष माननीय श्री महादेव जी वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली झाली या मिटिंग मध्ये रविदास महाराज जयंती उत्सव समिती मंठा अध्यक्षपदी श्री सोपान जी वाघमारे यांची निवड करण्यात आली व राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे मंठा तालुका अध्यक्ष श अंबादास घायाळ यांची सर्वानुमते निवड करण्यात आली व श्री प्रभू शिंदे सर यांची राष्ट्रीय चर्मकार महासंघ कर्मचारी तालुका अध्यक्षपदी पुनश्च निवड करण्यात आली मंठा शहराध्यक्षपदी विजय अंभोरे राष्ट्रीय चर्मकार युवा महासंघ मंठा तालुका अध्यक्षपदी सचिन शिंदे शहराध्यक्षपदी परसराम सोनटक्के व जयंतीची पूर्ण कमीटी ठरविण्यात आली त्यावेळी सर्व चर्मकार समाज बांधव उपस्थित होता यावेळी राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे नवनिर्वाचित तालुका अध्यक्ष अंबादास घायाळ यांचे सर्व चर्मकार समाजातून अभिनंदन करण्यात आले तालुक्यातून सर्व स्तरातुन त्यांचे अभिनंदन करण्यात आले