ओबीसींच्या प्रश्नांवर सातत्याने आक्रमक भूमिका घेऊन न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणारे माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांना "संघर्षयोद्धा लोकनेते गोपीनाथराव मुंडे पुरस्कार-२०२२" जााहीर,लोकनेते गोपीनाथराव मुंडे विचारमंच, महाराष्ट्र' प्रदेशाध्यक्ष देवेंद्र बारगजे, माजी आमदार तोताराम जी कायंदे व विकास पालवे यांची माहिती
प्रतिनिधी हनुमंत दवंडे
गेली ३५ वर्ष ओबीसी समाजाच्या वेगवेगळ्या प्रश्नांवर अत्यंत आक्रमकपणे रस्त्यावरची लढाई लढत ओबीसींच्या आरक्षणात सह इतर न्याय मागण्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करणारे तसेच वंजारी बंजारा माळी धनगर तेली साळी कोळी यांच्यासह तमाम ओबीसींचे प्रश्न सातत्याने शासन दरबारी मांडून तमाम ओबीसी बांधवांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असणारे सर्वसामान्य गोरगरीब व्यक्तीच्या सर्वांगीण विकासासाठी गावपातळीपासून राज्य स्तरापर्यंत सर्वतोपरी प्रयत्न करत आपल्या राजकीय सामाजिक धार्मिक कार्यातून मराठवाड्यासह संपूर्ण महाराष्ट्रात आपला ठसा उमटविणारे अगदी सर्वसामान्य कुटुंबात जन्म घेऊन गावातील सरपंच ते राज्याचे कॅबिनेट मंत्री पदापर्यंत वाटचाल करणारे स्वतःला "मी जो काही आहे तो गोपीनाथराव मुंडे साहेबांमुळे आहे" असे छातीठोकपणे भरसभेत सांगणारे परतुर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार माजी मंत्री बबनराव लोणीकर यांना लोकनेते गोपीनाथराव मुंडे विचारमंच महाराष्ट्र यांच्या वतीने दिला जाणारा *"संघर्षयोद्धा गोपीनाथराव मुंडे पुरस्कार-२०२२"* जाहीर करण्यात आला
ओबीसींच्या प्रश्नांवर सातत्याने लढा देत खऱ्या अर्थाने ओबीसींना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणारे जालना जिल्ह्यासह मराठवाड्यातील तमाम ओबीसी बांधवांना आपलेसे वाटणारे असे नेतृत्व म्हणून माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांच्याकडे बघितले जाते सामूहिक विवाह सोहळ्याच्या माध्यमातून गोरगरीब आत्महत्याग्रस्त कुटुंबातील ओबीसी समाजातील अकराशे मुलींचे अगदी थाटामाटात श्री लोणीकर यांनी लग्न लावून दिले आहेत लग्नामध्ये वर पित्याप्रमाणेच नववधूला मनी मंगळसूत्र चप्पल-बूट गादी पलंग यासोबतच ०१ लाख लोकांपेक्षा अधिक वऱ्हाडी मंडळींना स्नेहभोजन इत्यादी श्री लोणीकर करत असून त्यांच्या या कार्याचा गुणगौरव व्हावा यासाठी श्री लोणीकर यांना या पुरस्काराने गौरविण्यात येत आहे अशी माहिती आयोजकांनी दिली
ओबीसी समाजाला न्याय देताना श्री लोणीकर यांनी नेहमीच पुढाकार घेतला असून नेहमीच ओबीसी समाजाला आमदार लोणीकर आपल्या कुटुंबातील व्यक्ती वाटतात. सर्वसाधारण जागेवर परतूर पंचायत समितीमध्ये माणिकरावजी वाघमारे सर हरी रामजी माने या ओबीसी चेहऱ्यांना संधी देऊन ओबीसी बद्दल आपले प्रेम नेहमीच व्यक्त केले आहे मंठा पंचायत समितीमध देखील शिल्पा नरेंद्र पवार यांच्या रूपाने ओबीसी महिला सभापती पदावर विराजमान आहेत सातत्याने ओबीसी समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न श्री लोणीकर यांनी केला असून त्यांच्या याच कार्याचा गौरव करण्यासाठी त्यांना या पुरस्काराने गौरवान्वित करण्यात येत आहे
सर्वसामान्य माणसाची व्यथा आपल्य कार्यातून दूर करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणारे लोकनेते स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे यांच्या सोबत त्यांचे सहकारी म्हणून काम करणारे आणि स्वर्गीय मुंडे साहेबांना आपल्या राजकीय कारकिर्दीत अनन्यसाधारण महत्त्व देणारे माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांना यावर्षीचा "संघर्षयोद्धा गोपीनाथराव मुंडे पुरस्कार" जाहीर करत असल्याची घोषणा विचार मंचच्या वतीने आज केली दिनांक 26 फेब्रुवारी रोजी पालवे पेट्रोल पंप ढगी या ठिकाणी आयोजित हभप निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांच्या किर्तन सोहळ्यात प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडत असल्याची माहिती श्री विकास पालवे यांनी दिली.
माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी त्यांच्या राजकीय जीवनाची सुरुवात स्वर्गीय अटलबिहारी वाजपेयी जी स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे स्वर्गीय प्रमोदजी महाजन यांच्यासारख्या धुरंधरची प्रेरणा घेऊन केली होती पुढे गाव पातळीवर लोणी गावचे सरपंच ते थेट महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री असा खडतर आणि अत्यंत संघर्षमय राजकीय प्रवास करत मराठवाडा संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणात आपला वेगळा ठसा उमटवला आहे त्यांनी त्यांच्या राजकीय जीवनात मुंडे साहेबांनी सांगितलेल्या मार्गाने मार्गक्रमण करत गोरगरीब दीनदलित दुबळ्या कामगार कष्टकरी लोकांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्न केले व यापुढे देखील करत राहतील त्यामुळे मुंडे साहेबांच्या संघर्षाचा वारसा पुढे नेण्याचं काम माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर करत आहेत त्यामुळेच यावर्षीचा संघर्ष योद्धा गोपीनाथराव मुंडे पुरस्कार- २०२२ देऊन लोणीकर यांच्या कार्याला विचार मंचाच्या वतीने कौतुकाची थाप देण्याचं काम आणि करत आहोत अशी माहिती विचार मंचच्या वतीने माजी आमदार तोतारामजी कायंदे यांनी दिली.
========================
*ह.भ.प. निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांच्या कीर्तन सोहळ्यास उपस्थित राहा- विकास पालवे*
दि.२६ फेब्रुवारी रोजी माजीमंत्री आमदार बबनराव लोणीकर यांच्या वाढदिवसानिमित्त व लोकनेते गोपीनाथराव मुंडे विचारमंच यांच्या पुढाकाराने हभप निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांचे आयोजित करण्यात आले असून *सायंकाळी ४:३० वाजता पालवे पेट्रोलियम, सेवली रोड, ढगी* या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून कीर्तन-श्रवणाचा लाभ घेण्यासाठी हजारोच्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन कार्यक्रमाचे आयोजक भारतीय जनता युवा मोर्चाचे जालना जिल्हा उपाध्यक्ष तथा वंजारी सेवा संघाचे जालना जिल्हाध्यक्ष विकास पालवे यांनी दिली.