असंघटीत कामगार आणि महिलांच्या लसीकरणासाठी “मिशन कोरोना विजय”
असंघटीत कामगार आणि महिलांचे लसीकरण पूर्ण करण्यासाठी सीएससी अकॅडमी, अमेरिकन इंडियन फौंडेशण आणि युवा जागृती संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने “मिशन कोरोना विजय” प्रकल्प राबवण्यात येत आहे. लसीकरणाबाबत गैरसमज दूर करून असंघटीत कामगार, अपंग व्यक्ती, महिला, स्थलांतर होणारे कुटुंब यांचे लसीकरण पूर्ण करून घेणे हा या प्रकल्पाचे मुख्य उददेश आहे. या प्रकल्पा अंतर्गत जिल्ह्यातील गावा –गावात जाऊन स्थलांतरीत होणारी कुटुंब, अपंग व्यक्ती आणि काळजीवाहक, किशोरवयीन मुलं यांच्यामध्ये लसीकरणा बाबत जनजागृती निर्माण करण्यात आली. त्यांच्यासाठी त्यांना जवळ आणि सोयीच्या ठिकाणी लसीकरण शिबिराचे आयोजन देखील करण्यात आले. गावातील सरपंच, आशा सेविका,अंगणवाडी सेविका आणि युवा स्वयंसेवक यांच्या सहायाने आता पर्यत जिल्ह्यातील 642 गावातील सुमारे चाळीस हजार व्यक्तींना लसीकरणासाठी प्रोत्साहित करून त्यांचे लसीकरण पूर्ण करण्यासाठी मदत आणि सहकार्य करण्यात आले असल्याचे जिल्हा समन्वयक श्री डॅनियल सुतार यांनी सांगितले. आगामी काळात ग्रामीण आणि दुर्गम भागातील प्रत्येक महिलाचे लसीकरण पूर्ण करन्यावर भर देण्यात येणार असल्याचे श्री सचिन अंभुरे यांनी प्रतिपादन केले या कामासाठी तांत्रिक आणि व्यवस्थापकिय सहाय सीएससीचे राज्य समन्वयक श्री. समीर पाटील, प्रकल्प समन्वयक श्री. सुयोग दीक्षित आणि वैभव देशपांडे हे करत आहेत. 12 लाख असंघटीत कामगारांचे लसीकरण पूर्ण करण्याचे लक्ष निर्धारित केले होते आता पर्यत संपूर्ण भारतात या प्रकल्पा अंतर्गत 1,064,523 लोकांचे लसीकरण पूर्ण करण्यात आले असल्याचे युवा जागृती संस्थेचे सचिव श्री. गोकुळ चंद सैनी यांनी सांगितले.