श्रद्धा वायाळ हिने जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेत पटकावले प्रथम पारितोषिक
परतूर /प्रतिनिधी हनुमंत दवंडे
जालना जिल्ह्यातील तीन दिवसीय जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन द ग्लोबल गुरुकुल इंग्लिश स्कूल जालना येथे भरवण्यात आले होते या जिल्हा स्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये कॅरम, टेबल टेनिस,बुद्धिबळ,कराटे,स्केटिंग, आर्चरी व बॅटमिंटन या स्पर्धेचे आयोजन केले होते या विविध स्पर्धा करिता जिल्ह्यातून अनेक खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता यामध्ये परतूर येथील श्रद्धा नामदेव वायाळ या विद्यार्थिनीने बॅडमिंटन स्पर्धेमध्ये प्रथम पारितोषिक पटकावले या स्पर्धेचे वितरण अप्पर पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले
या स्पर्धेत बॅडमिंटन मध्ये जिल्हास्तरीय प्रथम पारितोषिक पटकावलेली श्रद्धा नामदेव वायाळ या विद्यार्थिनीला अप्पर पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख यांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आले पारितोषक मध्ये मानचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात आले होते
या यशाबद्दल तिचे कौतुक आमदार बबनराव लोणीकर माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया युवा मोर्चा प्रदेश महामंत्री राहुल लोणीकर कपिल आकात नितीन जेथलिया बॅडमिंटनचे जिल्हा सचिव नागोजी चिखलकर माजी उपनगराध्यक्ष संदीप बाहेकर नगरसेवक प्रकाश चव्हाण नगरसेवक कृष्णा आरगडे माजी नगरसेवक शिवा बलम खाने शिवा विभुते प्रशिक्षक पेडगावकर सर तलाठी रेड्डी उपप्राचार्य संभाजी तिडके उपमुख्याध्यापक शेषराव वायाळ प्रमोद राठोड पत्रकार संघाचे अध्यक्ष शामसुंदर चितोड संजय कदम या यशाबद्दल आदींनी तिचे अभिनंदन केले