सभापती कपिल आकात यांच्याकडून आर्थिक मदत

परतूर – प्रतिनिधी/हनुमंत दवंडे 
तालुक्यातील दैठना खुर्द येथे घराला आग लागून नुकसान झाल्याने राष्ट्रवादीचे युवक जिल्हाध्यक्ष तथा सभापती कपिल आकात यांनी भेट घेऊन पंचवीस हजार रुपये आर्थिक मदत केली आहे.
दत्ता विष्णु सवने यांचे घरी त्याची आईने गॅस पेटवूला असता गॅसचा भडका झाल्याने घरातील संस्कार उपयोगी साहित्य व नगदी रोख रक्कम जाळून खाक झाल्याची घटना दि २४ फेब्रुवारी २०२२ रोजी घडली होती.
अग्निशामक व गावकर्‍यांनी आग आटोक्यात आणली. गॅस टाकीचा विस्फोट न झाल्याने पुढील अनर्थ टळला. या आगीत घरासह घरातील एक किंट्टल गहू, ज्वारी, किराणा, कपाट, कपडे, लोखंडी टीन पत्रे, व नगदी रोख रक्कम दोन लाख तीन हजार रुपये जाळून खाक झाले. या आगीत अंदाजे तीन ते साडेतीन लाख रुपयाचे नुकसान झाले होते. राष्ट्रवादीचे युवक जिल्हाध्यक्ष तथा सभापती कपिल आकात यांनी दि १ मार्च २०२२ रोजी कुटुंबियांची भेट घेऊन पंचवीस हजार रुपयाचा आर्थिक मदतीचा धनादेश सुपूर्द केला आहे. यावेळी बंडेराव सवने, अनिकेत नवल,सरपंच सोनाजी गाडेकर, ओमकर काटे, अंकुश शिंदे, मोहन बाण, वसंत सवने, सुरेश सवने, हरिभाऊ सवने, महादेव सवने, सुनील तायडे, दीपक सवने, दौलत सवने, संजय सवने, तातेराव सवने, दत्ता सवने, बाळासाहेब ताठे, अमोल सवने, विकास सवने, प्रयागबाई सवने यांच्यासह आदि ग्रामस्थ उपस्थित होते.   

Popular posts from this blog

लाच स्वीकारताना कारला येथील ग्रामसेवक घुगे यांना रंगेहाथ पकडले

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत

रायगव्हाण येथे शिव महापुराण कथेची अति उत्साहात सांगता....