परतुर शहरासह ग्रामीण भागात विनाल्या जात आहे अंधश्रद्धा चे जाळे.....
परतुर दि 02 प्रतिनिधी हनुमंत दवंडे
परतूर शहरासह ग्रामीण भागात सध्या मोठ्या प्रमाणात अंधश्रद्धा चे जाळे विणले जात असून यामध्ये सुजाण नागरिकांसह सुशिक्षित नागरिक बळी पडत आहे तर यातून बुवाबाजी करणारी मोठी आर्थिक लूट करताना दिसत आहे.
भारत देश 21 व्या शतकात विज्ञाननाच्या दृष्टिकोन समोर ठेऊन मोठी प्रगती करताना दिसत आहे तर एकीकडे अनेक सुशक्षित नागरिक अंधश्रध्दा चा सहारा घेत जीवन जगताना दिसत आहे. अशीच काही परिस्थिती परतूर शहरात परिसरात निर्माण झाली आहे बुबाजी करून नागरिकांना लुटणाऱ्या टोळीत अनेक शासकीय व निमशासकीय कर्मचारी देखिल आहेत. महिन्यातील अमावस्या किंवा पौर्णिमेला कुठंतरी एखाद्या मंदिरा जवळ अंधश्रद्धा वर विश्वास ठेवणारे नागरिक बोलून त्यांचे सकून पाहणे,भानामती,चेतूक, काळी भावली जाळणे, बिबे येणे आशा आजाराची भीती दाखवून खुलेआम पैसे लुटणे चालू आहे. मागील काही वर्षा पूर्वी अंधश्रद्धा निर्मोलन समितीच्या पदाधिकारी एकनाथ कदम,रमाकांत बरीदे, लक्ष्मीकांत माने, कल्याण बागल यांनी आनंदवाडी येथील एका भोंदूबाबा ला सापळा रचून पकडले होते व पोलिसांच्या स्वाधीन केले होते.पन या प्रकारानंतर अनेक दिवस या प्रकारांना आळा बसला होता पण मागील काही दिवसांपासून पुन्हा तोंड वर काढताना दिसत आहे.सध्या शहरात दर रविवारी हा प्रकार इतका उघडपणे चालू आहे की याला कोण रोख लावणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.यामुळे गोरगरीब जनतेची मोठी आर्थिक लूट होऊन ते अंधश्रद्धा चे बळी पडत आहे.
परतूर शहरात व ग्रामीण भागात असा प्रकार जर कुठे चालू असेल तर नागरिकांनी न घाबरता पोलिसांना संपर्क करावा आशा भोंदूबाबा बाबा चा शोध घेऊन लवकरच त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल.
श्यामसुंदर कौठाळे
पोलीस निरीक्षक
आयुष्यात निर्माण होणाऱ्या प्रश्नांची सहज सोडवणूक झाली नाही तर मनुष्य अंधश्रद्धा च्या आहारी जातो व त्याचाच भोंदूबाबा गैरफायदा घेतात त्यामुळे प्रत्येकाला कार्यकारण समजण्याची वृत्ती निर्माण होणे गरजेचे आहे.
एकनाथ कदम
राज्य कार्यकारणी सदस्य
अंधश्रद्धा निर्मोलन समिती सदस्य