सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

दैठणा फाटा येथे अखंड हरिनाम सप्ताहाची मोठ्या उत्साहात सांगता

परतूर प्रतिनिधी हनुमंत दवंडे 
 तालुक्यातील दैठणा फाटा येथे प.पू ब्रम्हनिष्ठगुरु गंगाभारती महाराज  यांच्या कृपा आशीर्वादाने अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता हभप बाळू महाराज गिरगावकर यांच्या काल्याचे कीर्तनानी झाली.
दैठणा फाटा येथे झालेल्या अखंड  हरिनाम सप्ताहात काकडा भजन, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, श्रीमद भागवत कथा, गाथा भजन, हरिपाठ, रात्री नामवंत किर्तनकार यांचे कीर्तन प्रवचन व जागर कार्यक्रम झाले. तसेच भागवत कथा प्रवक्ते भागवताचा-र्य हभप नामदेव महाराज शास्त्री शिळवणीकर यांच्या सुमधुर वाणीतून संपन्न झाली. दि १५ मार्च रोजी एक वाजता हभप बाळू महाराज गिरगावकर यांच्या काल्याचे कीर्तनानी सप्ताहाची सांगता झाली.  
यावेळी हभप बाळू महाराज गिरगावकर बोलताना म्हणाले की ग्रामीण भागात अंधश्रद्धेचे भूत भरलेले असते भाविकांनी अंधश्रद्धा डोक्यात ठेऊ नका. भाविकांचा विश्वास संपादन करून गैरफायदा घेतला जात असल्याने अंधश्रद्धेच्या बळी पडू नका असे आवाहन केले. या सप्ताह दरम्यान माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया, राष्ट्रवादीचे युवक जिल्हाध्यक्ष कपिल आकात, शिवसेनेचे जिल्हा संघटक मोहन अग्रवाल, नितिन जेथलिया, भाजपा युवा मोर्चा तालुकाध्यक्ष शत्रुघ्न कणसे, बळीराम कडपे, जि.प. सदस्य प्रतिभा इंद्रजीत घनवट, सुदर्शन सोळंके, मधुकर खरात, ओंकार काटे, बाबासाहेब गाडगे, तसेच डॉक्टर, व्यापारी, प्रतिष्ठित नागरिकसह पंचक्रोशीतील भाविकांची मोठ्या संखेने उपस्थिती होते 

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत