दत्त मंदिर संस्थान तळणी भोलेनाथ गड येथे पहिल्यांदाच गोमातेचे डोहाळे जेवणाचा कार्यक्रम संपन्न
तळणी प्रतिनिधी रवी पाटील
दत्त मंदिर संस्थान तळणी भोलेनाथ गड येथे पहिल्यांदाच गोमातेचे डोहाळे जेवणाचा कार्यक्रम दत्त मंदिर संस्थान चे मठाधिपती महंत श्री चरणदास जी महाराज यांनी आयोजीत केला होता सपूर्ण तळणी परीसरात पहिल्यांदाच गाईचे डोहाळे जेवण आयोजीत केले असल्याने हा कार्यक्रम बघण्यासाठी मोठया प्रमाणात भावीकांची उपस्थीती होती विषेश करून मातृशक्ती मोठी उपस्थीती यावेळी दीसून आली सर्वप्रथम ब्रम्हवृंदांच्या उपस्थीतीत गाईची विधीवत पूजा करण्यात आली पाच सौभाग्यवतीच्या हाताने गाईची ओटी भरून तीचे औक्षण करण्यात आले गाईसाठी सर्व फळाची आरास तिच्या समोर मांडण्यात आली गाईला हारानी सजवण्यात आले होते श्री दत्तात्रय संस्थांनचे मठाधीपती चरणदास महाराज यांनी त्यांच्या लाडक्या गाईचे डोहाळे जेवण आयोजित केले होते या कार्यक्रमासाठी महाराजाचा भक्त परिवार तळणी चिकलठाणा रायपुर हातनुर वैजापूर नाऊर औरंगाबाद या ठिकानाऊन भक्त मंडळी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले महाराजानी जमलेल्या सर्व भक्तांना गोमातेचे महत्व पटवून दिले नंतर गाईची ओटी भरून पुजा आरती करून महिलामंडळींनी हळद कुंकू लावून गाईची ओटी भरली नंतर मठाच्या वतिने सर्व भक्तांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले गाईच्या पुजेचे मुख्य मानकरी पशुवैद्यकीय चिकित्सक डॉ वासुदेव शंकर राठोड खुरामपुर मंत्र उच्चारण करणारे कल्याण महाराज जोशी
सर्व भक्तांनी महाराजांचे असा नविन उपक्रम राबवलल्या बद्दल खुप खुप कौतुक केले
हिन्दू धर्मामध्ये गाईचे मोठे महत्व आहे आजच्या कठीण काळात गोमाते वर संकटे येत आहे तीचे संगोपण होणे गरजेचे असून या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश हा गो सेवाच असल्याचा संदेश समाजा पर्यन्त जाण्यासाठीच गाईचे डोहाळ जेवणाचे आयोजन करण्यात आले असल्याचे मंहत चरणदास महाराज यांनी सांगीतले