साधु संताच्या विचाराचा आदर करा -ह भ प नामदेव महाराज ढवळे यांचे कानडी येथे प्रातिपादन
उद्या ह भ प विशाल महाराज खोले यांच्या काल्याच्या किर्तनाने सांगता
तळणी :( रवि पाटील )
मनुष्याने कथा पाठ किर्तन करून जर त्याच्या आचरणात वागण्यात बदल होत नसेल तर ते किर्तन ऐकुण काहीही फायदा होणार नाही साधुं संताच्या विचारांचा त्याच्या शब्दांचा मान आपण ठेवू शकत नसाल तर हजार किर्तन ऐकुन ही त्याचाकुठलाच फायदा होणार नसल्याचे
*विष्णूदास नामदेव महाराज ढवळे चारठाणकर यानी कांनडी येथे सांगीतले*
आता हे सोवळे जाले त्रिभूवन विषम धोऊन सांडीयले या अंभगावर निरूपण केले
संत विचारच हे मनुष्याच्या आयुष्याला परीवर्तीत करू शकतात फक्त तो विचार मनुष्याने स्वीकारण्याची गरज आजच्या युगात जास्त आहे सांधु संतांच्या शब्दाचा मान ठेवणे त्याच्या शब्दाप्रमाणे वागणे म्हणजेच त्याचे अनुकरण होय
मनुष्याच्या सांसारीक आयुष्यात अनेक प्रकारची व्यसने आहेत संसार या शब्दाचा अर्थच मुळात आस्थिर आहे आस्थिर गोष्ट मनुष्याच्या हिताची कधीच नसती तरी सुध्दा मनुष्य संसार या गोष्टीला चिकटवून बसला आहे मनुष्याच्या डोक्यावरील काळ्या केसाचे पांढरे केस कधी झाली याची तीथी वार मनुष्य सांगू शकत नाही ते मनुष्याला कधी कळतच नाही संसारातला ऊद्याचा मनुष्याला आहे की नाही हे जसे समजत नाही मनुष्याचा देह सुध्दा एक संसार आहे कारण देहामध्ये सुध्दा बदल होतच असतो संसारातील व्यसन म्हणजे दोष विकार दुःख हेच आहेत हे संसारात नकोसे असेल तर किर्तनाची संगत धरा तरच ते नाहीशे होतील
देहाला खर समजल्यामुळेच संसारात दुःख विकार निर्माण होतात साधु संतानी सागितले तरी संसार रुपी देहाला तो चिकटला आहे देह हे शेतातील बुजगावण्याप्रमाणे आहे ज्या बुजगावण्यामुळे चोराला भय निर्माण झाले त्याला खर समजल्यामुळे भेद आणि दोष विकार दुःख निर्माण होतात तसेच मनुष्य जोपर्यन्त देहाला खरे समजेल तोपर्यन्त विकार दोष दुःख हे निर्माण होतच राहणार
देह हा खोटा आहे हे समजण्यासाठी उपाय काय असू शकतो तर त्यासाठी किर्तन आणि नामस्मरणच या गोष्टी मनुष्याला त्या खर खोटयाची जाणीव करून देतात शुध्द होण्यासाठी किर्तन आवश्यक आहे त्यासाठी किर्तनाचे प्रकार आहेत कृठले कीर्तन केले म्हणज मनुष्य शुध्द होईल नाम किर्तन गुण किर्तन स्वरुप किर्तन लिला किर्तन या प्रकारापैकी स्वरूप किर्तन केले म्हणजे मनुष्य शुध्द होईल स्वरूप किर्तन म्हणजे आपले किर्तन ते किर्तन केल्याशिवाय संसार सुध्दा शुद्ध होणार नाही तर कलयुगात नामसकीर्तनाची आवश्यकता अतं करण शुध्दीसाठी गरजेची आहे मनुष्याला नामसकीर्तनाची जोड आवश्यक असून आर्थीक विषयांचा संच केल्या पेक्षा नामस्मरणाचा संचय असने सध्या गरजेच आहे
कलयुगात मनुष्याला कमी आयुष्य आहे त्यातील अर्ध आयुष्य हे झोपण्यातच जाते काही तारूण्यात जाते तर काही वृध्दापकाळात जाते या तीनही अवस्थेमधून मनूष्य जेव्हा जात असतो त्या प्रत्येक पायरीला नामस्मरणाची जर जोड दीली तर मनुष्याचा शेवट चांगला झाल्याशिवाय राहणार नाही जे किर्तन देवाने केले ते तुम्ही आम्ही केले तर फरक काय पडतो किर्तन हे ऐकूण आचरणात आणायचे साधन आहे देहातील दोष दुःख जाण्यासाठी कीर्तनाची गरज आहे किर्तनाने अतं करण शुध्द होत असते ते शुध्द झाल्यावर मनुष्याला ब्रम्हद्रष्टी प्राप्त होते मनुष्याला चर्मद्रष्टी आहे पंरतू ब्रम्हद्रष्टी नाही ती प्राप्त करायची असेल तर नामस्मरण आणि कीर्तनाची जोड आवश्यक असल्याचे महाराजांनी सांगीतले
कानडी येथील कानीफनाथ मंदीरात नाथषष्टी च्या निमीताने सप्ताहाचे आयोजन कानडी ग्रामस्थाच्या वतीने करण्यात आले असून यंदाचे हे ४४ वे वर्ष आहे श्री संत नेमीनाथ महाराज वारकरी शिक्षण संस्थेतील विद्यार्थी साथ संगत करत आहे ऊद्या ह भ प विशाल महाराज खोले याच्या काल्याच्या किर्तनाने या सप्ताहची सांगता होणार आहे