आ.विनायक मेटे बद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या वर कारवाई करा अन्यथा महाराष्ट्रभर आंदोलन करू-सचिन खरात


परतूर प्रतिनिधी, हनुमंत दवंडे 
 शिवसंग्राम संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बहुजन नायक आ. विनायकराव मेटे यांच्याबद्दल सोशल मीडिया फेसबुकच्या माध्यमातून आक्षेपार्ह असभ्य भाषेत मजकूर टाकून बदनामी केली आहे. यामुळे आ. मेटे समर्थकांची मने दुखावली असुन पोस्ट टाकणाऱ्या बद्दल रोष निर्माण झाला आहे. बदनामीकारक पोस्ट करणाऱ्या व्यक्तीवर माहिती तंत्रज्ञान कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करा, अन्यथा महाराष्ट्रभर आंदोलन करु असे शिवसंग्राम तालुका अध्यक्ष सचिन खरात यांनी पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांना निवेदन दिले आहे.
सोशल मीडिया फेसबुकवर दीपक इंदर थोरात या व्यक्तीने स्वतःच्या अकाउंट वरून आ. विनायकराव मेटे यांच्याबद्दल बदनामी करण्याच्या हेतूने आक्षेपार्ह असभ्य भाषेचे पोस्ट टाकली आहे. यामुळे शिवसंग्राम संघटनेचे कार्यकर्ते संतप्त झाले. पोस्ट टाकणारा दीपक इंदर थोरात याचा यांच्या निषेध करून ठाणेदारांना निवेदन दिले. मेटे हे अठरापगड जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन चालणारे नेतृत्व आहे. समाजातील लोक त्यांना बहुजन नायक म्हणून मागणी ओळखतात. मात्र दीपक इंदर थोरात या मानसिक रुग्ण व्यक्तीने फेसबुकच्या माध्यमातून स्वतःच्या अकाउंट वरून आ. मेटे यांच्या बाबत आक्षेपार्ह भाषा वापरून पोस्ट टाकली. सदरील पोस्टमुळे तमाम शिवसंग्राम संघटनेच्या कार्यकर्त्यांमध्ये तसेच आ.मेटे मानणाऱ्या वर्गामध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे. त्यामुळे दीपक इंदर थोरात या व्यक्तीवर माहिती तंत्रज्ञान कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करावा अशी मागणी शिवसंग्राम संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली. निवेदनावर शिवसंग्राम संघटनेचे तालुकाध्यक्ष सचिन खरात, भारत राजबिंडे,मनेष वटाणे, गणेश सांगुळे, व अनेक कार्यकर्ते उपस्थित होते*

Popular posts from this blog

परतूर येथून चोरीला गेलेला अयशरचा पोलिसांनी लावला गुन्ह्याचा छडा, परतूर पोलिसांचा तपासाला आले यश ८१ किंट्टल ६५ किलो कापूस, आठ लाख रुपये किमतीचा अयशर चोरट्यांनी पळविला होता.

अमृत भारत स्टेशन पुनर्विकास योजनेद्वारे परतुर रेल्वे स्थानकाचा कायापालट होणार, परतुर स्थानकाच्या पुनर्विकासासाठी केंद्र सरकारतर्फे २२ कोटी ०८ लाख रुपयांचा निधी - आमदार बबनराव लोणीकर यांचे प्रतिपादन, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या शुभहस्ते ई-भूमिपूजन सोहळा संपन्न, मराठवाड्यातील ०९ स्थानकांच्या पुनर्विकास कार्यक्रम अंतर्गत छत्रपती संभाजीनगर नंतर परतूर येथे सर्वाधिक उपस्थिती

न्यु वंडर किड्स इंग्लीश स्कूल विघार्थ्याचे यश