दैठणा खुर्द येथे जागतिक जल दिन साजरा*
परतूर प्रतिनिधी हनुमंत दवंडे
तालुक्यातील दैठना खुर्द येथे तालुका विधी सेवा समिती व वकिल संघ परतूर यांच्या संयुक्त विद्यमाने कायदे विषयक शिबीराचे आयोजन दि २२ मार्च २०२२ रोजी करून जागतिक जल दिन साजरा करण्यात आला आहे.
सदरील शिबीरामध्ये जागतिक जल दिनाच्या निमित्ताने विविध विषयावर व्याख्यात्यांनी मार्गदर्शन केले. त्यात कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दिवाणी न्यायाधीश श्रीमती पी.एन. कोकाटे यांनी असंघटीत कामगारांच्या समस्या व त्यावरील उपाय योजना या विषयी मार्गदर्शन अध्यक्षीय भाषणात केले.
तसेच यावेळी विधीज्ञ ए.जी. चव्हाण यांनी स्वच्छ हवा आणि स्वच्छ पाण्याचे महत्व विषद केले. विधीज्ञ एम.पी.वेडेकर पाण्याचे महत्व पटवून दिले. विधीज्ञ आर.एल.लिंबुळकर यांनी पाणी आडवून ते जमिनीत जिरउन पाणी पातळी वाढविण्याचे आवाहन केले.
या कार्यक्रमास विधीज्ञ आर.एल पाईकराव, सचिव विधीज्ञ एम.आर. सोळंके, तालूका विधी सेवा प्राधिकरण कर्मचारी, तसेच दैठणा खुर्द येथील गांवकरी, महिला यांची मोठया प्रमाणावर उपस्थिती होती. वकिल संघाचे अध्यक्ष विधिज्ञ ए. जी. चव्हाण यांनी प्रास्ताविक केले, विधीज्ञ ए.ए. जवळेकर यांनी सुत्रसंचलन तर आभार विधिज्ञ एन.एम.म्हस्के यांनी मानल