सातोना सर्कल मध्ये आमदार लोणीकरांच्या वाढदिवसा निमित्त बैल गाडा शर्यत व क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन,आमदार बबनराव लोणीकर यांनी केले उदघाटन,क्रीडा स्पर्धा च्या माध्यमातून एकोपा वाढण्यास मदत,सातोना येथे बैलगाडा शर्यतीचा जल्लोष तर रेवलगाव येथे क्रिकेट स्पर्धांचे उत्साह,बैलगाडी शर्यत म्हणजे जिव्हाळा जपणारा शेतकऱ्यांचा खेळ*- माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर

परतूर प्रतिनिधी हनुमंत दवंडे 
रात्रंदिवस शेतात कष्ट करणाऱ्या काळ्या मातीत राबणार्या जगाच्या पोसिंद्या शेतकऱ्यांच्या आवडीचा खेळ म्हणून बैलगाडा शर्यती कडे पाहिले जाते, मात्र पेटा सारख्या कायद्यामुळे ही शर्यत नामशेष होण्याच्या मार्गावर होती मात्र न्यायालयाने बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवल्यामुळे शेतकरी आनंदी झाला असून आज सातोना येथे होत असलेल्या या बैलगाडा शर्यतीचा आपणास आनंद असल्याचे माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी म्हटले आहे
  ते सातोना तालुका परतुर येथे आयोजित बैलगाडा शर्यत व रेवलगाव तालुका परतुर येथील क्रिकेट स्पर्धांच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते
 पुढे बोलताना ते म्हणाले की पेटा सारख्या कायद्यामुळे जनावरांच्या संवेदने विषयी प्रश्न उपस्थित केले जात होते मात्र शेतकरी स्वतःच्या मुलाला जित्का जीव लावतो तितकाच गोठ्यातील गाई-बैलांना ही जीव लावतो असे सांगतानाच शेतकऱ्यांच्या शेतामधील आलेल्या यंत्रसामुग्री मुळे बैल ही प्रजात मोठ्या संख्येने कमी झाली होती मात्र शर्यतीला मान्यता मिळाल्यामुळे पुन्हा एकदा गोठ्या खिल्लार बैलांचा जोड दिसणार आहे
   ही समाधानाची बाब असून काळ्यामातीत राब राब राबणाऱ्या शेतकऱ्यांना आनंद देणारी ही गोष्ट असल्याचे यावेळी माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी सांगितले
 पुढे बोलताना ते म्हणाले की माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने सातोना सर्कलमध्ये आज क्रिकेट स्पर्धा बैलगाडा शर्यत होत आहे गेल्या पंधरा दिवसापासून मतदार संघाच्या कानाकोपऱ्यात अनेक उपक्रम राबविण्यात आले त्यात कुस्ती स्पर्धा कबड्डी स्पर्धा रक्तदान शिबिर समाज प्रबोधन पर हरी किर्तन अशा अनेक माध्यमातून कार्यकर्त्यांनी माझ्यावरील प्रेम व्यक्त केले त्याबद्दल मी सदैव व कार्यकर्त्यांच्या ऋणात राहू इच्छितो
 आपण गेली पस्तीस वर्षे केलेल्या सेवेचे हे फळ असून मी आपण दिलेले प्रेम कदापि विसरणार नसून शरीराच्या शेवटच्या श्वासापर्यंत जनतेची सेवा करणार असल्याचे यावेळी त्यांनी बोलतांना सांगितले
     जिद्द आणि चिकाटी या दोन गोष्टी च्या बळावर जगातली कुठलीही गोष्ट अशक्य नसून हे साध्य करण्यासाठी प्रत्येकाने स्वतःची जबाबदारी ओळखून काम केल्यास निश्चित पणाने समाज विकास साधला जाईल असे यावेळी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना ते म्हणाले
   मी लोणी गावचा सरपंच पदापासून थेट मंत्री पदापर्यंत मारलेली मजल ही केवळ आपल्या सर्वांच्या पाठबळामुळे शक्य झाले असल्याचे ते म्हणाले यापुढेही आपल्या सर्वांच्या पाठबळावर निश्चित पणाने मतदार संघाचा विकासाचा हा यज्ञ असाच तेवत ठेवण्याची आपली इच्छा असून आपल्या सर्वांच्या सहकार्याने गोरगरीब दीनदलित दुबळ्या ची सेवा यापुढे आपण करणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले
  यावेळी विलासराव आकात परमेश्वर आकात जितू अण्णा अंभोरे संपत टकले रोहन आकात बंडू मानवतकर शिवाजी तरवटे रंगनाथ रेंगे अशोक दांगट, सुनील लहाने प्रकाशराव गाढवे ओम साठे यांच्यासह शेतकरी क्रीडाप्रेमी व खेळाडू यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती

Popular posts from this blog

अमृत भारत स्टेशन पुनर्विकास योजनेद्वारे परतुर रेल्वे स्थानकाचा कायापालट होणार, परतुर स्थानकाच्या पुनर्विकासासाठी केंद्र सरकारतर्फे २२ कोटी ०८ लाख रुपयांचा निधी - आमदार बबनराव लोणीकर यांचे प्रतिपादन, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या शुभहस्ते ई-भूमिपूजन सोहळा संपन्न, मराठवाड्यातील ०९ स्थानकांच्या पुनर्विकास कार्यक्रम अंतर्गत छत्रपती संभाजीनगर नंतर परतूर येथे सर्वाधिक उपस्थिती

न्यु वंडर किड्स इंग्लीश स्कूल विघार्थ्याचे यश

लाच स्वीकारताना कारला येथील ग्रामसेवक घुगे यांना रंगेहाथ पकडले