सन आँफ आंबेडकर ग्रूपचे सनी गायकवाड यांच्या पाठ पुराव्या मुळे वंचित घटकातील बांधकाम लेबर लोकांना मा.आ.सुरेश कुमार जेथलिया यांच्या हास्ते कामगार सुरक्षा किटचे वाटप
परतूर प्रतिनिधी /हनुमंत दवंडे
गेल्या अनेक वर्षा पासुन सन आँफ आंबेडकर ग्रूपच्या वतिने गोर गरीब,वंचित लोकांचे कामे सनी गायकवाड हे करत आहेत,या लेबर कार्डच त्यांनी वेळोवेळी पाठपुरावा करुन त्या मंजुर करुन परतुर मंठा विधानसभाचे माजी आमदार सुरेश कुमार जेथलिया यांच्या हास्ते लेबर किट चे वाटप करण्यात आले,
यामध्ये महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणी कामगार यांची सन ऑफ आंबेडकर ग्रुप च्या माध्यमातून नोंदणी करण्यात आली होती आणि या सततच्या पाठपुराव्यामुळे सनी गायकवाड यांच्या मुळे कामगारांना गृहपयोगी 30 वस्तूंचा संच दिला आहे. कामगारांना कामाच्या ठिकाणी उपयुक्त अशा सुरक्षा संचाचे वाटप करण्यात आले . आता संसाराला उपयोगी पडणारे साहित्य कामगारांना मिळाले आहे.
बांधकाम कामगार हा सातत्याने स्थलांतरित करीत असतो. एका साईटवरील काम संपले की नवीन बांधकामाच्या ठिकाणी अगदी कुटुंबासह अनेक बांधकाम कामगार जात असतात. अशावेळी अनेक अडचणींचा या बांधकाम कामगारांना सामना करावा लागतो. अगदी निवासस्थानाची सोय, पाल्यांचे शिक्षण आणि आरोग्यविषयक समस्या यांची मोठी गैरसोय होत असते, पण यातूनही या बांधकाम
कामगारांना गृहपयोगी 30 वस्तूंच्या संचाचे वाटप केले यामध्ये गृहपयोगी वस्तूमध्ये एकूण 30 वस्तू दिल्या आहेत. यामध्ये ताट -4, वाट्या -8, ग्लास-4, पातेले - 3, मोठा चमचा -2, जग -1, मसाला डबा -1, डबे -3, परात -1, प्रेशर कुकर -1, कढई - 1, टाकी - 1 या वस्तूंचा समावेश आहे.
लाभार्थ्यांमध्ये नाराजीची भावना पूर्वी लाभार्थ्यांच्या बॅंक खात्याते थेट रक्कम जमा होत होती. पाल्यांना शिष्यवृत्ती दिली जात होती. याशिवाय थेट आर्थिक लाभ दिले जात होते. आता मात्र कल्याणकारी मंडळाकडून रक्कम देण्याऐवजी साहित्य देण्यावर भर दिला जात आहे.परतुर येथे कामगारांना किट चे वितरण करण्यात आले . त्यावेळी कामगारांनी आपले मत व्यक्त केले . या वेळी लाभ मिळालेल्या कामगारांनी सन आँफ आंबेडकर ग्रूपच तोंडभरुन कौतुक केले. मा.आ.सुरेश कुमार जेथलिया यांनी
पण या कामा बदल सनी गायकवाड यांच कौतुक केल या सुरक्षा किटचे वाटप करतानी, काँग्रेसचे ता.अध्यक्ष बाबाजी गाडगे,न.प.चे गटनेते बाबुरावजी हिवाळे,नगरसेवक ,राजेश भुजबळ,तारेख शेख,अविनाश शहाने,दगडु घोडे,पाशा शेख,मतिन शेख,सुनिल मथुरे,जब्बार खान हे उपस्थित होते..यावेळी सनी गायकवाड यांनी कामगारांना आव्हान केले आहे की जर कुणाला लेबर कार्ड बद्दल अडचण असेल तर त्यांनी सन ऑफ आंबेडकर ग्रुप शी संपर्क साधावा..