मनुष्याच्या कृळाने कोणी श्रेष्ठ होत नाही मनुष्याचे श्रेष्ठत्व त्याच्या साधने वरुन सिध्द होत-विशाल महाराज खोले

तळणी प्रतिनिधी रवि पाटील :
      मनुष्याच्या कृळाने कोणी श्रेष्ठ होत नाही मनुष्याचे श्रेष्ठत्व त्याच्या साधने वरुन सिध्द होत असते कोण जाणे घडे उपासना या ओवीप्रमाणे कोणाच्या समाजावरून ज्ञान गृहीत धरू शकत नाही या काळात अशा गोष्टीला थारा नाही असे प्रतिपादन ह भ प मुक्ताबाई संस्थांनचे मठाधिपती विशाल महाराज खोले यानी काल्यांची प्रसंगी कानडी येथे केले 

पाहाता गोवळी
खाय त्यांची उष्टावळी॥१॥
करिती नामाचे चितंन
गडी कान्होबाचे ध्यान॥ ध्र॥

या अभंगावर चित्तन केले मनुष्याने पंडित कोणालाही मणू शकत नाही आजच्या किर्तनात जो पाडीत्य दाखवेल तोच पंडित वाचक कोणाला म्हणावे जो अठरा पूराणाचे वाचन करतो त्याला वाचक म्हणावे पूर्ण जीवनाची कल्पना इश्वाराच्या पायावर वाहीली त्याने त्यांचे जीवन साध्य केले असे समजावे त्याने कृष्ण कथा ऐकायची आणि सांगायची काल्याच्या किर्तनात बाईचे  चरित्र कधी सागू नये धनाचे महत्व कधी सांगू नये त्यामुळे किर्तनाची मर्यादा भंग  होते कमी कालावधी मध्ये जास्त धन कमवण्याची ईच्छा मनुष्याने बाळगू नये तो पैसा जास्त काळ टिकत नाही स्वःत मेहनतीने जे अस्तीत्व मनुष्य निर्माण करू शकतो ते अस्तीत्व चिरकाल टिकणारे असते त्यामुळे घरात सुख शांती व समाधान मनुष्याला प्राप्त होते *जोडूनीया धन उत्तम व्यवहारे* या ओवीप्रमाणे व्यवहारीक जीवन मनुष्याने स्वीकारले पाहीजे  

जे मनुष्याच्या प्रारब्धामध्ये आहे ते मिळणारच आहे त्यासाठी विनाकारणाची ओढाताण करण्याची गरज मनुष्याला नाही तुकाराम महाराजांचा घात झाला म्हणून सागणाऱ्या नास्तीकाकडून नारदाच्या गादीवरून चरित्र कदापी ऐकायचे नाही नास्तीकाच्या तोडून कथा आपण कधीच श्रवण करू नये आपण फक्त कृष्ण कथा ऐकून जीवन सार्थकी करायचे कृष्ण कथा ऐकायला मनुष्याने  तत्पर असले पाहीजे कृष्ण चरित्रा मधील आनंद मनुष्याच्या उद्धारासाठी हितकारक आहे तुकाराम महारां जानी सागीतल्या प्रमाणे कृष्ण कथा ही मनुष्य जन्माला तारणारी कथा आहे ती प्रत्येकाने काल्याच्या निमित्याने स्वीकारली पाहीजे  कृष्ण भक्ती विणा कोणीच तर ले  नाही म्हणून त्या पूर्ण देवतेचे चितंन मनुष्याला करावेच लागेल त्या साठीच या काल्याच्या प्रसादासाठी येथे आले पाहीजे 

गोवळी म्हणजे गाई साभाळणारा तो चतूर असतो त्याच्या मध्ये मी पणा नसतो मनुष्याने गोवळ्याचे चित्र डोळ्यासमोर आणले पाहीजे त्याची वेशभूषा त्याचे चातुर्य लपवणारा म्हणजे गोवळी तो स्वःतचे महत्व हरवतो म्हणून तो त्याच्या पिसेपणाचा पसारा जगासमोर दाखवतो तो गोवळी त्याच्या कडे पाहून त्याची कार्यविद्वता दिसते कधी मोठेपणा दिसतो म्हणुन जगाचा मालंक भगवान श्रीकृष्ण त्याचे उष्ट खायला सुध्दा तयार झाला 

नामाच्या चित्तनावर मनुष्य जन्माचे सार्थक आहे पण ते नामचितन .करण्यासाठी मनुष्याला वेळ नाही ज्ञानोबा तुकोबाचे संत एकनाथाचे मुक्ताईचे अनेक उपकार या महाराष्टावर आहे त्याचे रुण आपण त्याना स्मरून फेडले पाहीजे  स्वःतच्या हातातील मोबाईल हा परमार्थापासून आपल्याला दूर लोटात आहे मोबाईल मध्य जास्त स्वारस्य मनु ष्याला वाटत तोच वेळ नाम साधने साठी द्या मुलीवर चागले संस्कार करा आई वडीलांची सेवा करा समाजामध्य आपल्या आई वडीलाची मान खाली जावू नये असे कृत्य मुला मुलीनी करू नये यावेळी महाराजांनी कृष्ण चारित्रवर प्रकाश टाकला गेल्या सात दिवसापासून चालू असलेल्या या सप्ताहाची सांगता महाप्रसादाने झाली नेमीनाथ महाराज वारकरी शिक्षण संस्थेतील विद्यार्थी यानी सात संगत केली यावेळी सोपान महाराज पेवेकर शालीकराम टेकाळे जनार्धन स्वामी विष्णू महाराज बादाड व कानडी ग्रामस्थानी परीश्रम घेतले

Popular posts from this blog

अमृत भारत स्टेशन पुनर्विकास योजनेद्वारे परतुर रेल्वे स्थानकाचा कायापालट होणार, परतुर स्थानकाच्या पुनर्विकासासाठी केंद्र सरकारतर्फे २२ कोटी ०८ लाख रुपयांचा निधी - आमदार बबनराव लोणीकर यांचे प्रतिपादन, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या शुभहस्ते ई-भूमिपूजन सोहळा संपन्न, मराठवाड्यातील ०९ स्थानकांच्या पुनर्विकास कार्यक्रम अंतर्गत छत्रपती संभाजीनगर नंतर परतूर येथे सर्वाधिक उपस्थिती

न्यु वंडर किड्स इंग्लीश स्कूल विघार्थ्याचे यश

परतूर येथून चोरीला गेलेला अयशरचा पोलिसांनी लावला गुन्ह्याचा छडा, परतूर पोलिसांचा तपासाला आले यश ८१ किंट्टल ६५ किलो कापूस, आठ लाख रुपये किमतीचा अयशर चोरट्यांनी पळविला होता.