तळणी मंठा तहसीलदार यांची अवैध वाळू प्रकरणी कारवाई
तळणी प्रतिनिधी रवी पाटील
येथून जवळच असलेल्या कानडी येथून अवैध वाळू उपसा करणारा दोन ब्रास चा टेम्पो क्र एम एच २१ बी एच ९००९ या टेम्पो चा पाठलाग करून तळणी बस स्टँन्ड परीसरातील वंसत नंगर येथे पकडण्यात आली
सदर कारवाई मंठा तहसीलदार कैलास वाघमारे व तळणी पोलीसचे बीट जमादार सुभाष राठोड यांच्या समवेत करण्यात आली तपासणी दरम्यान त्या टेम्पोचालकाकडे वाळू वाहतुकीचा परवाना मागितला असता संबंधीता वाळू वाहतुकीची पावती आढळली नाही संबंधीत टेम्पो कानडी येथील नानासाहेब खंदारे यांच्या मालकीचा असुन गाडी अडवल्या नतर संबंधीत गाडी मालकाने गाडी सोडवण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्टा केली तरी तहसीलदार वाघमारे यानी न जुमानता गाडी पोलीस चौकीत घेऊन जाण्याचे फर्मान सोडले दोन च दिवसापासुन शासनाच्या अधिकृत वाळू उपसा करणाऱ्या वाळू घाटातून उत्खनन चालू झाले असून याच संधीचा फायदा वाळू चोरी करणारे घेत आहे ज्या ठिकाणावरून वाळू उपसा करण्याची परवानगी नाही अशा ठिकाणावरून अवैध वाळू उपश्यास प्रतिबंध लागणे गरजेचे आहे खरे महसूल प्रशासनात नसलेला समन्वय वाळू माफीयाच्या पथ्यावर पडला असल्याने त्याचे फावत आहे तहसीलदार यानी मंडळ अधिकारी तलाठी यानी ज्याच्या त्याच्या हदीत लक्ष ठेवण्यासाठी पूर्ण वेळ त्या हद्दीत थाबण्याच्या सूचना देणे गरजेचे आहे वाळू घाठ चालू होताच एक पावती वाळू घाटावरून घेतली की त्याच पावतीर दीवसभर अवैध उत्खनन करण्यासाठी सुरवात झाली असून त्यावर आताच कारवाई करून वाळू माफीयाना लंगाम लावणे हे आव्हाहन महसूल व पोलीस प्रशासनास पेलवेल का हे लवकरच कळेल