सोपान गणपतराव चव्हाण यांची सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक पदी पदोन्नती



 मंठा प्रतिनिधी सुभाष वायाळ 
दि.१७ तालुक्यातील खोराड सावंगी येथील, महाराष्ट्र राज्य पोलीस विभागात गेल्या ३२ वर्षांपासून जालना जिल्ह्यात कार्यरत असलेले सोपान गणपतराव चव्हाण यांची सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदी पदोन्नती झाली.त्यांनी पोलीस अधीक्षक कार्यालय जालना,परतुर,टेभुर्णी,जाफ्राबाद,सेवली, आष्टी,मंठा ह्या सर्व पोलीस स्टेशनवर कार्यरत असतांना त्यांनी आतिशय कर्तव्यदक्षपणे कामे केली आहे.सोपान चव्हाण एक शेतकरी कुटुंबातील असून त्यांनी जिद्द चिकाटी आणि मेहनत करून जालना जिल्ह्यात १९९१ साली पोलीस भरती झाले आहे. त्यांनी पोलीस निरीक्षक,सहायक पोलीस निरीक्षक यांचे सन २००० ते २०२१ पर्यंत रायटर [ मुन्सी ] म्हणून काम पाहिले आहे. सोपान चव्हाण यांचा सामाजिक चळवळीचाही फार मोठा सहभाग असतो. 
माननीय पोलीस अधीक्षक विनायक देशमुख यांनी पदोन्नती दिल्याने माननीय पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांनी सोपान चव्हाण यांना स्टार लावले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या, यावेळी पोलिस उपनिरीक्षक आसमान शिंदे बलभीम राऊत सहाय्यक पोलीस निरीक्षक नारायण आढे, पो.हे.कॉ.उत्तम राठोड, हे.कॉ.बंनकर,मांगीलाल राठोड,विजय जुमडे,आनंद ढवळे,मदने,बाळू राठोड इत्यादी उपस्थित होते.

Popular posts from this blog

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

परतूर सेलू रोडवर मोटर सायकल झॉलो गाडीचा अपघात

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत