ज्या ठिकाणी श्रध्दा असते त्या ठिकाणी भगवंता येने भाग असते ती श्रध्दा फक्त पांखडी नसावी - श्री आनंद चैतन्य महाराज
तळणी ( रवि पाटील )
ज्या ठिकाणी श्रध्दा असते त्या ठिकाणी भगवंता येने भाग असते ती श्रध्दा फक्त पांखडी नसावी ती त्या सुष्टीनिर्मात्याला प्रिय असली पाहीजे जसे की अंधाराचे साम्राज्य एक दीप नाहीसा करतो तसेच मनुष्याच्या संसारूपी गाड्याच्या साम्राज्याला संत्संगाची जोड आवश्यक असल्याचे प्रतिपादन श्री आंनद चैतन्य महाराज यानी दहीफळ खंदारे येथे तीन दीवसाच्या सत्संग समारोपाच्या प्रसगी व्यक्त केले मनुष्याचे युद्ध बाहय जगासोबत अतंरमनासोबतच चालू आहे कारण रोगी मानसा सोबत रोगी गेला तर तो कसा बरा होईल जोपर्यन्त निरोगी मनाचा सहवास त्याला होनार नाही तोपर्यन्त तो बरा होणार नाही या सं सांरातील प्रत्येक मनुष्य हा दुःखी आहे कोणी मनाने तर कोणी तनाने दुःखी आहे कोणीच या संसारात शारीरीक दुःखी मानसीक दुःखी आहेच सर्व गोष्टीची सांसारीक उपलब्धतता असताना सुध्दा मनुष्य दुःखी आहे संसारीक सुखात कोणी पन्नीकडून तर कोणी त्याच्याच आपत्याकडून दुःखी आहे त्याच दुःखी माणसाला खरी गरज ही सत्संगांची आहे
मनुष्याने जर काही मागायचे असेल तर त्याने देवालाच मागीतले पाहीजे या दरिद्री व लुटारुनाभिकाऱ्याना मागवून आपली गरज भागणारच नाही भंगवत आपल्याला देईल त्या योग्यतेचे आपण असले पाहीजे कारण तो आपल्या सोबत असल्यावर भितीचे कारण काहीच नाही मनुष्याच्या नशीबात जे आहे ते मिळणारच आहे त्यासाठी वेळेची प्रतीक्षा करावी लागेलच त्या सिकंदराला सुध्दा सगळे वैभव सोडून जावे लागले सोबत काय पण येणार नाही मनुष्याचे आयुष्य हे दोनच दिवसाचे आहे जन्म आणि मूत्यू यामधल्या अंतरात मिळणाऱ्या संधीचा उपयोग हा सत्संगाचा धरला तर जीवन सार्थकी होईल खाली हाताने जन्म घेऊन आलेला मनुष्य हा खाली हातानेच जाणार आहे त्याला खरी गरज धनाची नाही तर भक्ती मार्गाने जाण्याची गरज आहे कारण हा मनुष्य जन्म परत मिळनार नाही मिळालेला जन्म हा ज्ञानरूपी दिवा लावण्यासाठी असले पाहीजे
मनुष्याने श्रद्धावान असले पाहीजे तर धर्माला प्राप्त होतो तो धर्म कोणता तर सत्यतेचा आचरणाचा अहिसेचा शिलतेचा असला तर पाहीजे तरच तो सनातन धर्माचा मूळ असल्याचे सिध्द होते आजकाल धर्माला दुषण देणाऱ्याची संख्या मोठी असून आपण आपला सनातन धर्माचे पालन केले पाहीजे तलवार कीती जरी मोठी असली तरी तीची भूमीका ही विभाजणांची आहे आपली भूमिका ही सुई ची असली पाहीजे जे की फाटलेले शिवते व त्याला एकत्रित ठेवते .एकत्रित ठेवण्याची खरी भूमिका ही सनातन धर्माची असुन त्याचे सर्वानी पालन करणे गरजेचे आहे
समाजात नास्तीक आणि आस्तीक परमार्थीक आणि अपरमार्थीक यांचा भरणा असला तरी ज्या ठीकाणी आस्तीकता असते त्याच ठीकाणी धर्माचे अस्तीत्व असते ते टिकणे गरजेचे आहे भगवान श्रीकृष्ण मर्यादा पूरूषोत्तम राम याचा आदर्श यांचा सघर्ष आपण डोळ्यासमोर ठेवला पाहीजे कुठल्याही क्षेञात तुम्ही जा त्यासाठी तुम्हाला मेहनत साधना तपाचीच गरज असतेच या सर्व गोष्टीचा वावर ज्याच्या आयुष्यात असतो तोच यशाचे शिखर गाठतो आणि इतिहास त्यांचा च होतो ज्याच्या आयुष्यात संघर्ष आलेला असतो पांडवाच्या दुःखात भगवान श्रीकृष्णाची साथ होती पंरतू ज्या वेळस पांडवाकडे सुखाची नादी असते त्यावेळेस कृष्णाकडून कुंतीने वरदान घेतले की आमच्या सुखात तुच नाही नाही तर त्या सुखाचा पांडव स्वीकार कसा करतील कसा त्यासाठी तुझा सहवासच आमच्यासाठी सुख आहे
मनुष्याच्या आयुष्यात मर्यादा महत्वाच्या आहेत त्याचा संस्कार प्रत्येकावर असला पाहीजे आपला आपला भारत हा विश्वगूरु आहे भारताची भूमिका ही मार्गदर्शकाची असून सध्याची भारताची वाटचाल ही महासत्ते बरोबर विश्वगूरूच्या दिशेने चालू आहे या तीन दीवशीय सत्संगामध्ये महाराजानी देशभक्ती गीताची मेजवानी उपस्थीताना दीली
योगधाम दहिफळ खंदारे येथील योगानंद बापू व त्याच्या अनुयाकडून या सत्संगाचे भव्य दिव्य आयोजन करण्यात आले होते या सत्संगाच्या समारोपाला अनेक राजकीय पक्षाच्या नेत्यांची हजेरी होती महाप्रसादाने या सत्संगांची सांगता झाली