जीवनाच्या परीक्षेत यशस्वी होण्यासाठी कठोर परिश्रमाची गरज –एकनाथ कदम,आनंद विद्यालयात संपन्न झाला दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभपरतूर प्रतिनिधी हनुमंत दवंडे 
                दहावी शालेय जीवनाची शेवटी पायरी असल्याने या नंतरचे प्रत्येक पाऊल जबाबदारीने टाकणे गरजेचे आहे. इथपर्यंतच्या प्रवासात आपले कुटुंब,आपले शिक्षक आणि इतरांनी आपल्याला वेळोवेळी सहकार्य केले. या नंतरची लढाई मात्र आपल्याला एकट्याच्या हिमतीने लढायची आहे. परीक्षा असो वा जीवनातील एखादी जबाबदारी यशस्वीरित्या पार पडायची असेल तर कठोर परिश्रमाला पर्याय नाही.आपल्यातील क्षमता ओळखून त्या अधिक बळकट करण्यासाठी, आपली बलस्थाने अधिक भक्कम करण्यासाठी पुढील आयुष्यात आपण कायम प्रयत्नशील असले पाहिजे, असे प्रतिपादन शिवछत्रपती शिक्षण व क्रीडा मंडळाचे अध्यक्ष एकनाथ कदम यांनी केले आहे. शनिवारी आनंद विद्यालयातील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांच्या निरोप समारंभ प्रसंगी आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी आदर्श शिक्षक, गट समन्वयक कल्याणराव बागल, मुख्याध्यापिका सत्यशीला तौर-कदम, संजय कदम आदीची प्रमुख उपस्थिती होती.  

     दहावी नंतर जीवनातला एक नवा अध्याय सुरु होणार आहे. या प्रवासात अनेक वेळा अनेकांना अपयशाचा सामना कराव लागू शकतो. अशावेळी स्वतःचा आत्मविश्वास आणि संयम न ढळू देता, अपयशावर मात करण्याचा प्रयत्न करावा. अपयश ही यशाची पहिली पायरी आहे हे कधीही विसरता कामानये. कुठलेही यश अपघाताने मिळत नसून त्यासाठी परिश्रम आणि नियोजन करावे लागतेच हा मूलमंत्र कायम स्मरणात ठेवा असे आवाहन पुढे बोलतांना कदम यांनी केले.

     यावेळी शाळेतील काही विद्यार्थ्यांनी आपल्या आतापर्यंतच्या शालेय जीवनातील कडू-गोड आठवणीना उजाळा दिला. ज्या शाळेत आपण लहानाच्रे मोठे झालो, ज्या शाळेने आपल्याला अंगाखांद्यावर खेळवले त्या शाळेचा निरोप घेतांना अनेक विद्यार्थ्यांना हुंदका आवरता आला नाही. यावेळी शाळेतील काही शिक्षकांनी देखील मनोगत व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संजय कदम, विक्रम भांडवलकर, प्रशांत वेडेकर, रमेश लुलेकर, अनुजा गारकर, उदिता उपाध्याय यांच्यासह इतर शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Popular posts from this blog

अमृत भारत स्टेशन पुनर्विकास योजनेद्वारे परतुर रेल्वे स्थानकाचा कायापालट होणार, परतुर स्थानकाच्या पुनर्विकासासाठी केंद्र सरकारतर्फे २२ कोटी ०८ लाख रुपयांचा निधी - आमदार बबनराव लोणीकर यांचे प्रतिपादन, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या शुभहस्ते ई-भूमिपूजन सोहळा संपन्न, मराठवाड्यातील ०९ स्थानकांच्या पुनर्विकास कार्यक्रम अंतर्गत छत्रपती संभाजीनगर नंतर परतूर येथे सर्वाधिक उपस्थिती

न्यु वंडर किड्स इंग्लीश स्कूल विघार्थ्याचे यश

परतूर येथून चोरीला गेलेला अयशरचा पोलिसांनी लावला गुन्ह्याचा छडा, परतूर पोलिसांचा तपासाला आले यश ८१ किंट्टल ६५ किलो कापूस, आठ लाख रुपये किमतीचा अयशर चोरट्यांनी पळविला होता.